कोळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा : विंग ता. कराड येथील आदर्श विद्या मंदिरात विख्यात गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने बालवैज्ञानिक आनंद मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला बालवैज्ञानिक विज्ञान व गणित प्रदर्शन व विविध स्पर्धा उद्घाघटन समारंभ मा.मुख्याध्यापक श्री अशोक देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मौजे विंग ग्रामपंचायतींच्या सरपंच सौ. शुभांगीताई खबाले,उपसरपंच श्री सचिन पाचुपुते,स्कूल कमिटी अध्यक्ष श्री निळकंठ खबाले , श्री भागवत कणसे ,श्री विठ्ठल राऊत शेठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आर एस पी छात्रसैनिकांनी मानवंदना दिल्यानंतर गणित विषयावर आधारित मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. स्वागत यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतात अलौकिक प्रतिभासंपन्न गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जीवनपट विद्यार्थ्यांच्या समोर स्पष्ट करून अवघ्या 33 वर्षाच्या आयुष्यात विविध गणिती सूत्रे व सिद्धांतांच्या माध्यमातून गणित क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा जीवनपट उलगडला व जीवनाचे गणितही योग्य रीतीने सोडविल्यास आयुष्य आनंदाने व चिंताविरहित व्यथित करता येते असे सांगितले. सरपंच सौ. शुभांगीताई खबाले यांनी मनोगतात सांगितले की आदर्श विद्यामंदिर विंग हे उपक्रमशील विद्यालय असून आम्हा सर्वांसाठी ही बाब गौरवास्पद आहे.विविध स्पर्धा व उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यालयाचे अनेक विद्यार्थी भविष्यात देशभक्त व वैज्ञानिक बनून भारत देशाची सेवा करतील असे सांगून विविध उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री.अशोक देसाई यांनी बालवैज्ञानिक आनंद मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल व भविष्यात त्याचे सुंदर फलित दिसेल असे सांगितले .वक्तृत्व,निबंध ,चित्रकला, रांगोळी, प्रश्नमंजुषा, विज्ञान व गणित उपकरणे अशा विविध दालनाचे उद्घाघटन मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास श्री वसंत देवकर श्री भास्करराव थोरात श्री अनिल यादव श्री बाळकृष्ण कुंभार ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष कासार पाटील श्री बाबुराव खबाले श्रीकांत सावंत श्री उमेश बिचुकले श्री नितीन पाटील सौ शारदा पाटील उपस्थित होते आभार श्री विजयकुमार माने यांनी मानले.
आदर्श विद्यामंदिर विंग येथे बालवैज्ञानिक आनंद मेळावा संपन्न .