जन सहकार नागरी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

वर्धापनदिना निमित्त सारंग बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती.



सारंग पाटील बाबा यांचे स्वागत करताना चेअरमन मारुतराव मोळावडे व इतर मान्यवर.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गरजूंना आर्थिक मदतीचा हात देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी "जन सहकार" सहकारातील एक खणखणीत नाणे आहे. अल्पावधीतच जन सहकार नागरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शक कारभाराने ग्राहकांचा विश्वास संपादन करून प्रगतीची गरुड भरारी घेतली आहे. असे प्रतिपादन सारंग बाबा पाटील यांनी व्यक्त केले.

जनसहकार पतसंस्थेच्या कराड येथील शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील (बाबा) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

यावेळी उपस्थित सभासद, ठेवीदार हितचिंतक व्यापारी वर्ग यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जनसहकार सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे व सहकारातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सारंग पाटील (बाबा) म्हणाले की, मारुतीराव मोळावडे यांनी अतिशय काटेकोरपणे व पारदर्शक कारभार करत जनसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे. वर्षभरात सहकाराचे नियम तंतोतंत पाळून सभासद, व्यापारी, जनसामान्यांना बँकिंग सेवा पुरविली आहे.

अल्पावधीतच प्रसिध्द झालेली व आपल्या पारदर्शक कारभाराने जनतेचा विश्वास संपादन करून सहकारात एक वेगळी उंची गाठलेली सहकारी संस्था म्हणजे 'जनसहकार पतसंस्था' होय.

बँकिंग क्षेत्रातील नवनवीन बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत जनसहकार निधी पतसंस्था देत असलेल्या सेवा-सुविधांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. संस्थेकडे काही काळातच कोट्यावधी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या व या ठेवींच्या भक्कम आधारावर तालुक्यातील गरजूंना, छोट्या उद्योग व्यवसायांना पतपुरवठा करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे मोठे कार्य या जन सहकार पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे चेअरमन वांगखोऱ्याचे सुपुत्र मारुतीराव मोळवडे व त्यांच्या संचालक मंडळींनी केले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चेअरमन मारुतीराव मोळावडे म्हणाले, जनसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन स्थापन झालेल्या या संस्थेने वर्षभरात घेतलेली प्रगतीकारक झेप ही चोख, पारदर्शक कारभार व विश्वासार्हतेची पोच आहे. संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधांचा लाभ ग्राहक घेत असून संस्थेच्या आर्थिक पाठबळावर अनेक कुटुंबे स्वबळावर उभी राहात असल्याचा मोठा आनंद आम्हाला आहे. कराड तालुक्यातील व्यापाऱ्यांनी, ग्राहकांनी संस्थे वर जो विश्वास दाखवला वर्षभरातच उदंड प्रतिसाद दिला त्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. यापुढच्या काळातही आणखी नवनवीन सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे सेवा पुरविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता सामाजिक जाणिवेतून बांधिलकी जपण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील आहे.

कराड : उपस्थितांना मार्गदर्शन करताना सारंग बाबा पाटील.

अशा या बँकिंग, सहकार व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण, सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक / चेअरमन श्री.मारुती मोळावडे, व्हा.चेअरमन श्री.अमोल मोरे, संचालक श्री.सुनील आडावकर, श्री.काशिनाथ जाधव, तज्ञ् संचालक श्री.महम्मदहनीफ सुतार, संचालिका सौ. सुरेखा नलवडे, सौ. निर्मला मोळावडे सर्व संचालक मंडळ,सल्लागार मंडळासोबत सर्व कर्मचारी वृंद व व्यापारी बंधू उपस्थित होते.

या वेळी श्री.विलासराव पाटील (अध्यक्ष रोटरी शिक्षण संस्था कराड), श्री. प्रकाश शिंदे (संपादक, पतसंस्था संदेश डायरी, श्री. सौरभ पाटील (नगरसेवक, कराड नगरपालिका), श्री. प्रदीप जाधव (शिवशंभो पतसंस्था), श्री. विश्वास जाधव (पोलीस पाटील, गोळेश्वर), श्री. आशिष थोरात (चेअरमन ओम आगाशिव पतसंस्था), श्री.सुरेश शिंदे, प्रा.धनंजय चिंचकर, अँड. ए. टी. सुतार, अँड. एल. बी पाटील, अँड. एम. एम. सय्यद, अँड. कोमल भोसले, सौं.भारती गणेशकर (MDRD LIC AGENT), श्री.दत्ता गणेशकर (MDRD LIC AGENT), भरत यादव (विमा सल्लागार), श्री मंगेश वास्के (विमा सल्लागार), श्री.तेजेश यादव (विमा सल्लागार), श्री.विनायक जाधव (विमा सल्लागार), श्री. पवार साहेब (दि कराड अर्बन बँक), श्री. प्रवीण पाटील (कृष्णा बँक), श्री. अशोकराव पाटील (माजी उपसभापती बाजार समिती कराड), श्री. आनंदराव सुतार (नगरसेवक, मलकापूर नगरपालिका), श्री संदीप पाटील सरपंच पोतले ग्रामपंचायत श्री.भालचंद्र भालेकर (लेखापरीक्षक कराड), श्री.अमोल बोडके (लेखापरीक्षक माण), श्री.बाबासाहेब आत्तार (लेखापरीक्षक माण), श्री बी.बी.ढालाईत (लेखा परीक्षक कराड), श्री.मिलिंद लखापती (ज्येष्ठ व्यापारी), श्री. महेश शिंदे (व्यापारी), श्री.नुरुल हसन पटेल (उद्योजक कराड), श्री.इकबाल सुतार (उद्योजक कराड), श्री.रमनलाल शहा (ज्येष्ठ व्यापारी कराड) श्री पोपट देसाई ,श्री अमृत बांदेकर श्री.रमेश ओसवाल (सल्लागार जनसहकार निधी), श्री.विकास कदम (खोडशी शेतीतज्ञ), श्री पांडुरंग पवार (कृषी अधिकारी पाटण), नेटविन कंपनीचे पदाधिकारी श्री वसंत फाटके सर, श्री शिवाजी कोंडेकर सर तसेच कराड परिसरातील सर्व व्यापारी बंधू, विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व हितचिंतक, सभासद व सेवक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.