साईकडे ग्रामपंचायतीत पाटणकर गटाची बाजी!


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
साईकडे ता पाटण येथील पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत पाटणकर गटाने दणदणीत विजय मिळवला. तर विरोधी ना.देसाई गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.

या वेळी सरपंच पदासह 4 सदस्य पदाच्या जागेवर पाटणकर गटाचे उमेदवार विजयी झाले. तर देसाई गटाला 2 जागांवर समाधान मानावे लागले. या वेळी सरपंच पदाच्या उमेदवार सुवर्णा मोरे यांनी 447 मते मिळवत विजयी झाल्या. सदस्य गणेश यादव, अर्चना सुतार, राहुल पाटील, कल्पना कांबळे हे उमेदवार विजयी ठरले तर देसाई गटातून अश्विनी कांबळे, सुनीता लोहार विजयी ठरल्या.

यावेळी पॅनल प्रमुख कार्यकर्ते नवनिर्वाचित सदस्य यांनी विजयी मिरवणूक काढत गुलाल उधळत विजयी जलोश साजरा केला.