श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ.च. विद्यालय मलकापूर येथे खेळाडूंचा सत्कार उत्साहात संपन्न.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आ.च विद्यालय व आदर्श जुनिअर कॉलेजमध्ये सिद्धी प्रकाश पवार व शीतल प्रीतम देसाई या खेळाडूंचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुशराव थोरात प्रमुख पाहुणे निजाम मोमीन यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे संपन्न झालेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सौ शितल प्रीतम देसाई यांनी 50 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक मिळवले तसेच कु. सिद्धी प्रकाश पवार हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय वेतलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्यावतीने पालक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंकुशराव थोरात विद्यार्थी व खेळाडूंना उद्देशून म्हणाले,कोणतेही क्षेत्र असो त्यात यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. तसेच मिळवलेले यश टिकवून ठेवणे हे ही तितकेच महत्त्वाचे असते.

 शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा कुंभार यांनी केले. त्या म्हणाल्या प्रत्येक क्षेत्रातल्या खेळाडूंनी यशस्वी खेळाडूंकडून प्रेरणा घ्यावी व आपला व विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा. 

कार्यक्रमास अंकुशराव थोरात, उत्तम पवार, प्रीतम देसाई निजामभाई मोमीन, कोच विश्वजीत चव्हाण, विभाग प्रमुख शीला पाटील, क्रीडा विभाग प्रमुख जे.एन.कराळे,मार्गदर्शक ज्ञानदेव कवळे,सौ.एस.टी.कांबळे, उपमुख्याध्यापक श्री ए बी थोरात, पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले, नीलम पवार,प्रकाश पवार, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एच.एम.मुल्ला यांनी केले.तसेच सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार ए. बी.थोरात यांनी मानले.