मोरणा,पाटण,ढेबेवाडी,कुंभारगाव,चाफळ व तारळे विभागात होणार भूमिपूजन कार्यक्रम.
पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे अर्थसंकल्प,पुरवणी अर्थसंकल्प,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शुक्रवार दि. 04 नोव्हेंबर ते रविवार दि. 06 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये मोरणा,पाटण,ढेबेवाडी,कुंभारगावं,चाफळ व तारळे विभागांमध्ये आयोजित केले असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे अर्थसंकल्प,पुरवणी अर्थसंकल्प, अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम या लेखाशिर्षाखाली मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते संपन्न होणार असून यामध्ये शुक्रवार दि. 04 नोव्हेंबर रोजी अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे खुर्द सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 किमी 0/00 ते 19/00 भाग किमी 4/00 ते 8/400 सुळेवाडी ते शिंदेवाडी चे बांधकाम करणे. र.रु.440.00 लक्ष व प्रजिमा 53 ते चोपडी बेलवडे खुर्द सुळेवाडी सोनवडे हुंबरवाडी नाटोशी धावडे रस्ता प्रजिमा 124 किमी 0/00 ते 19/00 भाग किमी 8/400 ते 12/600 शिंदेवाडी ते कुसरुंड चे बांधकाम र.रु.420.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन कार्यक्रम होणार असून दुपारी 03.00 वा कुसरुंड येथे जाहिर सभा होणार आहे. शनिवार दि.05 नोव्हेंबर रोजी पाटण येथे सकाळी 10.30 वा. अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर पाटण,जि.सातारा येथील प्रशासकीय इमारत र.रु. 15 कोटी या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तर अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर भोसगाव आंब्रुळकरवाडी नवीवाडी रुवले कारळे पाणेरी रस्ता प्रजिमा 122 किमी 0/00 ते 12/500 भाग किमी 0/00 ते 2/500 भोसगाव ते आंब्रुळकरवाडी चे रुंदीकरण व सुधारणा र.रु. 200.00 लक्ष,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती 2021-22 मधून मंजूर ढेबेवाडी भोसगाव उमरकांचन जिंती मोडकवाडी सातर रस्ता प्रजिमा 126 किमी 2/500, 7/200 येथील मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल बांधणे,किमी 0/00 ते 2/500 येथील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती 61.00 लक्ष,कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत मंजूर वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत पुनर्वसित गावठाण मौजे मेंढ,ता.पाटण येथील डोंगराकडील बाजूने संरक्षक भिंत बांधणे र.रु. 532.62 लक्ष या कामांचे भूमिपूजन होणार असून ढेबेवाडी येथे दुपारी 02.00 वा. जाहिर सभा होणार आहे. तसेच अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 8/500,23/350 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल बांधणे र.रु.45.00 लक्ष,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 9/400,23/100 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल बांधणे र.रु.240.00 लक्ष,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 9/100,5/620 येथे मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल/लहान पूल व किमी 20/650,21/600,27/300 येथे दरड काढणे,किमी 13/070 येथे पुलाचे/मोरींचे तुटलेले पेाहोच मार्ग दुरुस्त करणे. र.रु.230.00 लक्ष,इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी.22/700,23/100 येथील मोऱ्यांचे ठिकाणी बॉक्स सेल बांधणे,किमी 19/500,21/100,21/400,21/650 या ठिकाणी रस्त्यालगर कोसळलेली दरड काढणे किमी 9/080 येथे पुलाचे मोरींचे तुटलेले पोहोच मार्ग दुरुस्त किमी 7/00 ते 9/00, 9/200 ते 18/300, 18/400 ते 20/400 येथील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याची दुरुस्ती करणे. र.रु.140.00 लक्ष पुरवणी अर्थसंकल्प माहे डिसेंबर 2021-22 मधून मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी. 10/200 कसणी गांवाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.र.रु.200.00 लक्ष,अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 किमी 0/00 ते 25/00 भाग 18/00 ते 23/00 डाकेवाडी ते वाझोली फाटा चे रुंदीकरण व सुधारणा करणे.र.रु.400.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन होऊन दुपारी 04.00 वा. वाझोली येथे जाहिर सभा होणार आहे.रविवार दि.06 नोव्हेंबर रोजी अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा 53 किमी 0/00 ते 6/500 भाग चाफळ फाटा ते गमेवाडी रस्ता सुधारणा करणे.र.रु.270.00 लक्ष व नागठाणे तारळे सडावाघापूर पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 26/300 ते 38/00 भाग सडावाघापूर ते खंडूआईचे मंदिर रस्ता सुधारणा व रुंदीकरण करणे.र.रु. 150.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन व सकाळी 10.30 वा. माजगाव येथे जाहिर सभा होणार आहे.तर अर्थसंकल्प 2021-22 मधून मंजूर लोरेवाडी प्रजिमा 37 पासून कोंजवडे भुडकेवाडी कडवे खुर्द रस्ता प्रजिमा 129 किमी 0/00 ते 5/00 भाग कोंजवडे ते कडवे खुर्द मधील लांबीची सुधारणा करणे. र.रु.150.00 लक्ष,काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 0/00 ते 7/00 भाग काटेवाडी ते मुरुड मधील लांबीची सुधारणा व रुंदीकरण करणे. र.रु.350.00 लक्ष,अतिवृष्टी व पूरहानी दुरुस्ती काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी 0/980 मध्ये नवीन पूल बांधणे.र.रु. 190.00 लक्ष,काटेवाडी आवर्डे मुरुड मालोशी रस्ता प्रजिमा 128 किमी7/910 व 9/110 मध्ये नवीन पूल बांधणे. र.रु.245.00 लक्ष या कामांचे भूमिपूजन व दुपारी 01.00 वा. तारळे येथे जाहिर सभा होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.