तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सिने क्षेत्रासह विविध टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ‘‘शंभुदौलत जल्लोष’’ या कार्यक्रमासाठी आले होते. या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देवून त्यांचे स्वागत विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी केले. या अनोख्या व आपुलकीच्या भेटीमुळे सर्व सेलिब्रिटी भारावून गेले. सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अभिनय बेर्डे, कविता राम, मयुरेश पेम, गौरव मोरे, हिना पांचाळ, वनिता खरात, मीरा जोशी, विद्या सदाफुले, आकांक्षा कदम, राहुल सक्सेना या सेलिब्रिटींना त्यांच्या नावातील अक्षरगणेशा देण्यात आला. याप्रसंगी प्रदीप माने, जीवन काटेकर, छायाचित्रकार शंभूराज देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते. डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 13 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना आपली चित्रे भेट दिली आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मिळणाऱ्या मानधनातून गरजूंना रोख स्वरुपाची आर्थिक मदत केली आहे. कलेतून आत्मसमाधान आणि सामाजिक बांधिलकी हे सुत्र डॉ. संदीप डाकवे यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
यापूर्वी डॉ.डाकवे यांनी नाना पाटेकर, रविंद्र बेर्डे, डाॅ.अमोल कोल्हे, अशोक सराफ, सयाजी शिंदे, भरत जाधव, अषोक शिंदे, मकरंद अनासपुरे, जयराज नायर, अविनाश नारकर, डाॅ.गिरीश ओक, संजय नार्वेकर, भाऊ कदम, सिध्दार्थ जाधव, मंगेश देसाई, दिपक शिर्के, मकरंद देशपांडे, अभिजित खांडकेकर, सुबोध भावे, सागर कारंडे, अतुल परचुरे, किरण माने, ऐश्वर्या नारकर, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी, तेजा देवकर, प्रार्थना बेहरे, अनिता दाते आदि नामवंत व दिग्गज सेलिब्रिटींना चित्रे व अक्षरगणेशा भेट दिला आहे.
मुळच्या चिचांबा माटेकरवाडी येथील असलेल्या आणि चंदेरी दुनियेत आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुप्रसिध्द गायिका कविता राम यांनी पाटणच्या मायभूमीत आलेल्या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देण्याची तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.