अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे चेंबूरमध्ये लष्करातील सैनिकांचा गौरव

 


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबई आणि चेंबूर शाखेच्यावतीने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि दीप महोत्सव अशा दोन उपक्रमाचे औचित्य साधत भारतीय लष्करातील आजी-माजी सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला आला होता. 

अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा सरचिटणीस मोहन पवार यांच्या विशेष संकल्पनेतून आणि नियोजनातून पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये परिसरातील भारतीय लष्करातील आजी-माजी सैनिकांसह नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव,पत्रकार महेश अनुभवणे,संतोष भालेराव तसेच मराठा महासंघाचे सल्लागार शशिकांत घाग, महेश पालव, प्रकाश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष अविनाश राणे,महिला अध्यक्षा अनिता महाडिक,केंद्रीय कार्यकारिणी राष्ट्रीय संघटक  महेश सावंत आणि सल्लागार अविनाश महाडिक,उत्तम कदम, कृष्णा कडू,मारुती शिंगाडे यांच्यासह चेंबूर शाखाध्यक्ष किशोर घाग,महिला शाखाध्यक्ष किशोरी कडू, शाखा सरचिटणीस बाळू नानेकर,तालुकाध्यक्ष सुशील  सत्रे,युवक तालुकाध्यक्ष चेतन ढमाले,युवक अध्यक्ष अमित महाडिक तसेच अन्य पदाधिकारी, महिला- पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.