आनंदराव चव्हाण पतसंस्थेवर सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ केला : अभिजित पाटील

 


कराड : सभासदाला वाहन वितरण करताना चेअरमन अभिजित पाटील समवेत शाखा सल्लागार व संस्थेचे अधिकारी, सभासद व कर्मचारी.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ग्रामीण विभागात स्थापन झालेल्या आनंदराव चव्हाण पतसंस्थेने कराड शहरातील अनेक सभासदांना अर्थसहाय्य करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करून सभासदांनी संस्थेवर टाकलेला विश्वास सार्थ केला आहे, असे प्रतिपादन. आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी केले.

आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या गुरुवार पेठ कराड येथील शाखेच्या वतीने संस्थेचे सभासद हमीद शौकत नायकवडी यांना शाखा गुरुवार पेठ शाखेच्या माध्यमातून चारचाकी वाहनाचे वितरण संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गुरुवार पेठ कराड शाखा सल्लागार आझाद मुलाणी, अवधूत शिंदे, गंगाधर माने, शरद कणसे शाखाप्रमुख दादासो जाधव व कर्मचारी उपस्थित होते. शाखा प्रमुख दादासो जाधव यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला.