यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित कराडचे चेअरमन पदी प्रा.संजय जोतिराम थोरात यांची तर व्हॉइस चेअरमनपदी अविनाश हणमंतराव पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या सन 2021-22 ते सन 2026-27 या पाच वर्षासाठी कराडच्या अध्यासी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ एस.पी.भागवत यांचे अध्यक्षतेखाली तसेच शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली या निवडी श्री मळाई टॉवर मलकापूर या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या.
त्याचबरोबर नवीन संचालकांचीही निवड करण्यात आली .त्यामध्ये शेतीमित्र अशोकराव थोरात, मानाजी विलासराव थोरात, शिवाजी निवृत्ती भोसले, आप्पासो जगन्नाथ पाटील,सुधीर अरविंद चिवटे, शहाजी शामराव पाटील, सौ शिला दिलीप पाटील, सौ सुजाता सुनील शिंदे, विठ्ठल दादू येडगे, सुधीर शिवाजी लादे, दिलीप श्रीपती शिर्के या सर्वांचा यामध्ये समावेश आहे.
संस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमन पदी संजय थोरात व्हाईस चेअरमन अविनाश पाटील यांच्या निवडीबद्दल अशोकराव थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले व ते पुढे म्हणाले संस्थेची सद्य आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व शेतीपूरक व्यवसायांना, पर्यावरण पूरक प्रक्रियांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या संधी शोधून त्यामध्ये कौशल्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित चेअरमन प्राध्यापक संजय थोरात म्हणाले, शेतमाल विक्री करणारे फुुटपाथवर बसून भाजीपाला विक्री करणारे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना संरक्षण व मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन अविनाश पाटील म्हणाले, शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी संस्था स्वतःचा व्यवसाय स्व मालकीच्या जागेत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कराडच्या अध्यासी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ भागवत एस पी यांना सहकार परिषद निमंत्रण देतानाअधिकारी सौ. एस.पी.भागवत, कार्यक्रमास सर्जेराव शिंदे,सौ.गौरी जाधव ,दत्तात्रय शितोळे, सौ. अनुराधा घोडके, गणेश पोतदार,एम.पी.फराळे इ.उपस्थित होते.