साप्ताहिक शिवसमर्थ च्या दिवाळी अंक 2022 चे प्रकाशन दिमाखदारपणे पार पडले. श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य गुरु मल्लिकार्जुनबाबाजी महास्वामी धारेश्वर महाराज तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान, आदिमठाध्यक्ष, धारेश्वर मठ, अॅड.जनार्दन बोत्रे, संस्थापक/अध्यक्ष शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी, शिवाजी सुर्वे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, ग्रामीण कथाकार बा.शं.थावरे, कथाकार संतोष कदम सर, अंकाचे उपसंपादक संदीप डाकवे, नितीन पाटील, शिवसमर्थ मुख्य कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित केला जात आहे. या दिवाळी अंकांत नामवंत साहित्यिकांबरोबरच नवोदित लेखक कवी यांच्या साहित्याचाही समावेश केला जातो. आर्थिक सेवा देत असताना साहित्यिक चळवळीत शिवसमर्थ संस्था व परिवार योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.
गतवर्षी शिवसमर्थ दिवाळी अंकाला ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार’ मिळाला आहे. तसेच शिवसमर्थ च्या प्रथम दिवाळी अंकातील कथा इ.6 वी च्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात घेतली आहे. सन 2010 मध्ये दिवाळी अंकावर दै.नवाकाळ मध्ये प्रथम पानावर अग्रलेख छापून आला होता. सन 2011 रोजी अक्षररंग यांच्या वतीने दिवाळी अंकाला राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार मिळाला आहे. सन 2012 ते 2015 या कालावधीत आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्यावतीने उत्कृष्ट मांडणी पुरस्कार मिळाला आहे. तर गतवर्षी मराठी वृत्तपत्रलेखक संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने शिवसमर्थ अंकाचा गौरव झाला आहे.
_______________________________
प्लास्टिक मुक्तीचा नारा
विविध कार्यक्रमांना प्लास्टिकचे बॅनर वापरले जातात. हे बॅनर नष्ट होत नाहीत, त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. दिवाळी अंक प्रकाशन करताना स्टेजवर असणारा बॅनर हा कापडावर असावा अशी भूमिका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी मांडली. त्यानुसार स्टेजवरील बॅनर कापडयाचा बनवण्यात आला. हा बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. प्लास्टिक मुक्तीच्या दृष्टीकोनातून शिवसमर्थने हे पाऊल उचलले आहे. या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
_______________________________