मांगल्याचे प्रतीक आणि शुभमुहूर्त या दृष्टीने आपण दरवर्षी विजयादशमी साजरी करत असतो. प्रभू श्रीरामचंद्रांनी समष्टीच्या सुखासाठी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला. तो याच दिवशी. त्याचे स्मरण करण्याची वेळ आज आली आहे. समाज , राष्ट्र व धर्म यांचा हिताला हाणि पोचवणाऱ्या समस्टीतील .सर्व दुर्यजणांचा नाश करून आदर्श रामराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी कृतिशील होणे, म्हणजे खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करणे.
सीमोल्लंघन : दसऱ्याच्या दिवशी करायचे विधी ! अपराण्हकाली ( तिसऱ्या प्रहरी दुपारी )गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेकडे सीमोलंनासाठी जातात. जिथे शमी वृक्ष किंवा आपटा असेल तेथे थांबतात सध्या समाजाची मानसिकता क्षात्रधर्महीन झाली आहे. त्या करीता. सीमोल्लंघन करून . क्षात्रधर्म साधनेसाठीचे आवश्यक गुण आत्मसात करणे गरजेचे आहे.
शमी पूजन: या दिवशी शमीपूजन करतात .तिची पुढील प्रमाणे प्रार्थना करूया . हे शमी श्रीरामाने तुझी पूजा केली आहे.तू अर्जुनाच्या बाणांना धारण करणारी आहेस. मी दुरजणांच्या नाशासाठी व ईश्वरी राज्याच्या स्थापने साठी क्षात्रधर्माच्या लढ्यास सिद्ध होत आहे. या लढ्यात तू मला विजयी कर,
या दिवशी आपट्याची ही पूजा करतात. त्यालाही आपण प्रार्थना करुया, हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. भृष्टाचार, जात्यंधता, निष्क्रियता या समाजपुरुषाच्या महादोषांचे तू निवारण कर.
नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी अक्षदा, सुवर्णाचे किंवा तांब्याचे नाणे ठेवतात .मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्या जवळची थोडी माती व वृक्षाची पाने घरी आणतात.आणि हीआपट्याची पाने सोने म्हणून देवाला वाहतात व ईष्टमित्रांना देतात .सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते. असा संकेत आहे .
शस्त्रपूजा : या दिवशी राजे , सामंत व सरदार हे आपली शस्त्रे साफसुफ करुन त्याची पूजा मनोभावे करतात . शेतकरी ,व्यापारी, कारागीर हेही आपापली आऊते,हत्यारे यांची पूजा करतात.दुरजनांविरुध्दच्या लढ्यात आपल्याला स्थूल तसेच सुक्ष्म दोन्हीआयुधाचा वापर करावा लागणार आहे. सुक्षामातील आयुधे म्हणजे नामरुपी शस्त्र अधिक तीक्ष्ण करूया म्हणजे ईश्वराचा नामजप अधिक वाढवूया तसेच दुर्जनांशी शारीरिक व मानसिक पातळीवर लढा देण्यासाठी विविध संरक्षण कला आत्मसात करूया.दुरजणांविरुद्धच्या लढाईत आपला निर्णयाक विजय होई पर्यंत लढ्याची प्रतिज्ञा आज करूया.
- श्रीमती वासंती लावंघरे, सातारा