जिल्हातील प्रगतशिल युवा शेतकऱ्यांचा कृषी आयकॉन्स ने गौरव
शेतीला उच्च दर्जाचे स्थान होते, बळीराजा म्हणून शेतकऱ्याचा गौरव केला जायचा,दुर्देवाने आज शेतकरी उपेक्षित राहिला आहे,समाजात अनेक मत-मतांतरे वाढली आहेत,इतरांचे ऐकून घ्यायला कोणाला वेळ नाही. समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करणे गरजेचे आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून शेती करणाऱ्या महिला,बचत गट,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान केला जात आहे.
शेतकऱ्यांबद्दलची समाजातील नकारात्मक मानसिकता बदलली पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य मान- सन्मान मिळाला पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील फाऊंडेशन अध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.
सातारा : प्रगतशिल युवा शेतकरी यांना कृषी आयकाॅन्स पुरस्काराने गौरवताना सारंग पाटील
श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व युवा 360° आयोजित कृषी आयकाॅन्स(सातारा जिल्हा) या प्रयोगशील युवा शेतकरी सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते.
सारंग पाटील पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे शेतीतील वेगवेगळे उपक्रम जगासमोर जावेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी. शेतात काम करताना जिद्द व चिकाटी हवी,अभ्यासपूर्ण सेंद्रिय शेती केली पाहिजे,यापुढील काळात युवा शेतकर्यांना श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या माध्यमातुन सदैव सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्ह्यातील शंतनु साबळे,सौरभ साळुंखे,विजय घाडगे,नितीन भोसले,भूषण जाधव,शुभम यादव,संदिप माने,अमोल धायगुडे,प्रितम मोहिते,युवराज नांगरे,सागर डांगे,श्रीकांत पवार,नितिराज जाधव,बापुराव चोपडे,सागर थोरात यांचा कृषी आयकाॅन्स या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात युवा 360° व कृषी आयकाॅन्स या उपक्रमाची सविस्तर माहिती श्रीनिवास पाटील फाऊंडेशने समन्वयक प्रसाद नेहे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रविण कोळपे, प्रज्वल फाळके यांनी तर आभार साक्षी इंगळे यांनी मानले.