शेळकेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या वाहतूकीची सोय.


शेळकेवाडी ग्रामपंचायतव पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून विद्यालयात जाण्यासाठी केलेल्या वाहनासह विद्यार्थिनी व पालक,व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
शेळकेवाडी ( येवती ) ता.कराड ग्रामपंचायत व ग्रामस्थ आणि पालकांच्या संयुक्त प्रयत्नातून मुलींना शाळेत जाण्यासाठी असलेली वाहतुक व्यवस्थेची गैरसोय दुर करण्यात आल्याने मुलींची शेळकेवाडी ते येवती या ३ कि.मी अंतरात चालत जाऊन शिक्षण घेण्यासाठी सुरू असणारी पायपीट थांबली आहे.या करिता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ व पालकांचे योगदान फार मोलाचे ठरले आहे. 

      उंडाळे विभागातील येवती येथील शेळकेवाडी येथे ही सुविधा उपलब्ध करून देणेत आली शेळकेवाडी येवती या गावापासून सुमारे ३ कि मी अंतरावर पायी चालत माध्यमिक शिक्षणासाठी मुले जातात,पावसाळ्यात अनेक नैर्सगीक अडचणीना सामोरे जावे लागते याचा शारीरिक आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना विशेषतः मुलीना होत होता, सर्व अडचणीं व गावातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून पालक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचे दुरदृष्टीतून १५वे वित्त आयोगाच्या निधीतून व पालक आणि ग्रामस्थांच्या ऊस्फूर्त सहकार्या तून मुलींच्या वाहतूक व्यवस्थेची सुविधा करण्याचा निर्णय घेतला.

    वरीलप्रमाणे घेतलेला निर्णय तातडीने अंमलात आणला, याबद्दल सरपंच अधिकराव शेळके, सदस्य प्रकाश शेळके, सुजाता शेळके, शिवाजी चोरगे, पार्वती शेळके, पार्वती जाधव, रुपाली शेळके तसेच ग्रामसेवक संजय डाळे व ग्रामस्थ, युवक, पालक, शिक्षक, विद्यार्थी यानी परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांना धन्यवाद दिले.