'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व सनबीम शिक्षण समूहाचे अध्यक्ष सारंग श्रीनिवास पाटील यांची निवड झाली आहे. 

या निवडी बद्दल जनसहकार परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जनसहकार उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे, माजी उपसभापती पंचायत समिती पाटण रघुनाथराव जाधव तात्या, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव मोरे, जनसहकार निधी लिमिटेड चे संचालक काशिनाथ जाधव, मा. सरपंच ग्रामपंचायत सणबूर सचिन जाधव, विष्णू सपकाळ, श्रीरंग चाळके, सतीश मोरे व संभाजी मोरे या वेळी उपस्थित होते.

____________________________________

मा.सारंग पाटील (बाबा) यांचा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा फायदा रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोपविलेल्या जबाबदारीचे ते निश्चितपणे सोने करतील.

- मारुतीराव मोळावडे
चेअरमन जन सहकार निधी लि. तळमावले
.

____________________________________