कराड येथील कोटा अकॅडमीतील विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत घवघवीत यश


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कोटा अकॅडमी चे 13 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले. शिंदे तेजस्विनी दादासो हिला 96.55 पर्सेंटाइल मिळवून अव्वल आली . तसेच सेन ओमेन ,जीत शहा आर्यन थोरात , विश्वजीत सपकाळ ,आकाश खुस्पे, सुशांत जाधव ,राजवर्धन जगताप ,वैष्णवी बावकर, वेदांत पाटील ,प्राची केखलेकर ,आशुतोष काळे, सिद्धार्थ गायकवाड हे विद्यार्थी देखील जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022 रोजी कोटा अकॅडमी कराड येथे या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी स्वातंत्र्यसेनानी कोळेकर सरांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कोटा अकॅडमीचे संचालक  डॉ. महेश खुस्पे,  सौ. मंजिरी खुस्पे, मैथिली खुस्पे , प्राचार्या सौ. जयश्री पवार तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

 गेली 17 वर्षे कोटा अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आयआयटी, एनआयटी ,नामवंत इंजीनियरिंग तसेच मेडिकल कॉलेजमध्ये निवडले गेले आहेत. हीच ऐतिहासिक परंपरा यावर्षीही कायम राहिली असे कौतुक कोटा अकॅडमीचे संचालक मा. डॉ. महेश खुस्पे सरांनी व्यक्त केले.