काळगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा
काळगाव- रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव. विद्यालयांमध्ये "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" 15 ऑगस्ट रोजी विद्यालयांमध्ये सकाळी 7.30 वाजता उत्साहात साजरा केला. या वर्षी इयत्ता 10 वी मध्ये प्रथम क्रमांक आलेला काळे विराज गुणवंत यांने ध्वजारोहण केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनात सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी ध्वजसलामी, राष्ट्रगीत, झेंडागीत अतिशय उत्साहात साजरे केले.
या अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यालयाचे हितचिंतक, काळगावचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्कूल कमिटी सदस्य,वि.का. सेवा सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन,संचालक. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आजी-माजी सैनिक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे ए.पी. सर, विद्यालयाचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात रॅलीत सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, हर घर तिरंगा, भारत माता की जय... अशा घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते.
उपस्थितांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे ए.पी. सर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हे लटके व्ही.पी. सर व कलाशिक्षक श्री कुंभार बी.आर.सर यांनी केले. अशा तऱ्हेने विद्यालयात अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन संपन्न झाला.