उंडाळे : स्वातंत्र्यवीर करिअर अँकेडमीच्या उदघाटन प्रसंगी प्राचार्य बी आर पाटील, प्रा. एस. व्ही वेदपाठक,प्रा. एस. आर. सावळकर, प्रा. पी. टी. पाटील, प्रा. भरत सावंत.प्रा अजिम इनामदार आदी.
उंडाळे |कृष्णाकाठ वृत्तसेवा: डोंगरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण मिळावे व रोजगाराच्या नव्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी स्वातंत्र्यवीर करिअर अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. आर. पाटील यांनी केली. येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर करिअर अकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च माध्यमिकचे पर्यवेक्षक प्रा. एस व्ही वेदपाठक, माध्यमिकचे पर्यवेक्षक जे एस माळी, करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक प्रा. भरत सावंत, प्रा पी टी पाटील, प्रा. एस आर सावळकर, प्रा. सी. जी. कांबळे, प्रा. एस एस पाटील. प्रा, यु. के पाटील, प्रा. अजीम इनामदार यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्राचार्य श्री. पाटील म्हणाले शालेय वयातच विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात माहिती होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकला पाहिजे पोलीस भरती. आर्मी आदीसाठी विद्यार्थ्यांना लागणारे ज्ञान विद्यालय पातळीवरच मिळाले पाहिजे. म्हणून या अकॅडमी विद्यालयामध्ये सुरू करण्यात आली आहे. तरी परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी टी पाटील यांनी केले तर प्रा. अजीम इनामदार स्वागत केले. प्रा. यु. के. पाटील यांनी आभार मानले.