काले येथील महात्मा गांधी विद्यालयात विध्यार्त्याना खाऊ वाटप करताना.
कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
15 ऑगष्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधत कराड येथील इलेक्ट्रिकल मोटर रिपेरिंग ओनर्स चॅरिटेबल असोसिएशनने आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने एक सामाजिक बांधिलकी जोपासत काले ता कराड येथील लक्ष्मी चौकातील महात्मा गांधी विद्यालय, अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुला, मुलींना,ग्रामस्थ यांना खाऊ वाटप करण्यात आला. तसेच मसूर खोडजाईवाडी येथील शिवारात स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले बद्दल 75 रोपांचे वृक्षारोपण करून असोसिएशनने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत एक आगळावेगळा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संपत जगताप उपाध्यक्ष रमेश माने, सचिव शेरखान, खजिनदार राहुल जाधव, कार्याध्यक्ष हेमंत पाटील, सोमनाथ खैरमोडे, अमित यादव, सचिन चव्हाण, प्रशांत कुंभार, राजेंद्र पुजारी, आदि सदस्य उपस्थित होते.