बांधकाम क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आज देशात व जगात होताना दिसून येत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात अमुलाग्र बदल घडलेला दिसून येत आहे यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग शिकत असलेल्या अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे त्याचे ज्ञान प्राप्त करणे अतिशय गरजेचे आहे.
असे प्रतिपादन अंबुजा सिमेंट लिमिटेडचे टेक्निकल सर्व्हिस चे हेड प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले. घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी. टेक) महाविद्यालयात "Basics of dealing with cemeant Concrete" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते
यावेळी सिव्हिल इंजिनिअरिंगचे सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मार्गदर्शक प्रवीण पाटील यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी स्वागत केले.
यावेळी प्रवीण पाटील यांनी विद्यार्थ्यांना सिमेंट काँक्रीट तयार करताना घ्यावयाची काळजी, उपायोजना तसेच मायक्रो सिमेंट म्हणजे काय व त्याचा बांधकाम क्षेत्रात कशा पद्धतीने वापर केला जातो याची सविस्तर माहिती दिली व बांधकाम क्षेत्रातील नोकरीच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्वी तिकडूवे यांनी केले तर अतुल कोळेकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे आभार मानले.