डाॅ.संदीप डाकवे यांनी साकारल्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विविध छबी








तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विविध छबी साकारत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी दिल्या आहेत. पेपर कटींग आर्ट, ठिपके, स्क्रिबलिंग, रेखाचित्र अशा विविध माध्यमांतून उध्दव ठाकरे यांची साकारलेली चित्रे परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहेत. संवेदनशील मनाचे कलावंत असलेले पक्षप्रमुख यांना चित्रातून पण वेगळया पध्दतीने मानवंदना देण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखी पोट्रेट तयार केली आहेत. या सर्व पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे.

डाॅ.संदीप डाकवे यांनी चित्रे रेखाटत असतानाच त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत देखील केली आहे. डाॅ.डाकवे यांच्या कलेची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’, ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ मध्ये घेतली गेली आहे.

उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला डाॅ.डाकवे यांचा प्रतिसाद :

तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोरोना काळातील आवाहनाला प्रतिसाद देत डाॅ.संदीप डाकवे यांनी ‘एक कलाकृती कोरोनाविरुध्दच्या योद्यांसाठी’ हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळालेला मोबदला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये देवून दिला होता. त्याची दखल सीएम कोविड फंड कार्यालयाकडून घेण्यात आली होती.