तीन वर्षांपूर्वीच्या घटनेचा ढेबेवाडी पोलिसांनी लावला छडा : ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील घटना.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या भाग्यश्री संतोष माने हिचा २२ जानेवारी २०१९ रोजी अज्ञाताने गळा चिरून अतिशय क्रूरपणे खून केला होता. त्यावेळी हा प्रकार नरबळी व गुप्तधन मिळवण्यासाठी केला असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. त्या दृष्टीने तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे फिरवली व मयत मुलीचे वडील संतोष माने यास संशयित म्हणून अटक केली होती. मात्र तपासामध्ये त्याने कोणतीही माहिती दिली नाही. ठोस पुरावे नसल्यामुळे त्याची न्यायालयातून सुटका झाली. पुन्हा एकदा तीन वर्षांच्या कालावधीनंतर पोलिसांना या खूनाचा तपास करण्यात यश आले आहे. या खूनामध्ये मुलीची आजी व दोन मांत्रिकासह अन्य एक महिला अशा चौघांना ढेबेवाडी पोलिसांनी नुकतीच शिताफिने अटक केली आहे. यासंदर्भात ढेबेवाडी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की
ढेबेवाडी पोलीस ठाणे हददीत करपेवाडी, ता. पाटण गावच्या हददीत सुमारे ३ वर्षापूर्वी अज्ञात आरोपींनी एका शाळकरी मुलीचा खुन करुन पुरावे नष्ट केले होते. सदरबाबत ढेबेवाडी पोलीस ठाणेस गु.र.न. ०७/२०१९ भादविस ३०२,२०१ असा दाखल होता सदर गुन्हयाचा उलगडा करुन आरोपींच्या मुसक्या आवळणे ढेबेवाडी पोलीसांना मोठे आव्हान होवुन बसले होते. याबाबत श्री. अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक सो., सातारा तसेच मा. अजित बोऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक साो. सातारा यांच्या वेळोवेळी सुचना प्राप्त होत होत्या त्या अनुसरुन विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. संतोष पवार, यांनी सदर गुन्हयाचा तपास करत असताना मिरज, जि. सांगली येथे गुप्त धनाच्या आमिषातून २ कुटुंबातील ९ जणांची हत्या केलेच्या गुन्हयात अटक केलेल्या मुख्य आरोपी नामे मौलाना अब्बास बागवान, रा. सोलापुर याच्याबाबत तांत्रिक तपास केला असता भाग्यश्री माने हीचे खुनाच्या गुन्हयात असलेले अनेक संशयित आरोपी हे अब्बास बागवान याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या ढेबेवाडी पोलीस ठाणेस वर नमूद दाखल गुन्हयाच्या कालावधीत संपर्कात असलेचे दिसुन आलेने त्याबाबत मा. वरिष्ठांना कल्पना देऊन मा. वरीष्ठांच्या सुचनेप्रमाणे तात्काळ वेगवान हालचाली करुन गुन्हयातील मुख्य संशयितांपैकी विकास राठोड रा.न-हे गाव, ता. हवेली जिल्हा पुणे मुळ गाव मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर, फुलसिंग राठोड रा. ऐनापूर तांडा, जि. विजापूर तसेच मयत मुलीची आजी रंजना साळुंखे रा. करपेवाडी, कमल महापुरे, रा. खळे, ता. पाटण यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे कसून चौकशी केली असता नमुद गुन्हयात त्यांचा सहभाग निष्पन्न झाला असलेने त्यांना गुन्हयात अटक केली असुन सदरचा गुन्हा गुप्त धनाच्या आमिषापोटी व्यापक व नियोजनबध्द रितीने कट रचून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरच्या गुन्हयात मयत मुलगी भाग्यश्री हीच्या कुटुंबातील सदस्यांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचेकडे तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचा उलगडा करण्यासाठी किशोर धुमाळ पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे तसेच त्यांचे पथकाचे मोलाचे सहकार्य लाभलेने सदर गुन्हयातील मोकाट आरोपींच्या मुसक्या आवळण्यात ढेबेवाडी पोलीस पथकाला यश आलेने त्याबाबत सर्व स्तरातुन पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.
सदर पथकात मा. श्री. अजयकुमार बन्सल पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. अजित कुमार बो-हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाटण विभाग पाटण, यांचे मागर्दशनानुसार श्री. संतोष पवार, सपोनि. ढेबेवाडी पोलीस ठाणे, श्री. किशोर धुमाळ, पो. नि. स्थागुशा सातारा, तसेच पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, प्रशांत चव्हाण, नाचण, चंद्रकांत पाटील, माणिक पाटील, संग्राम बाबर, मयुर देशमुख, ननावरे ,मोहसिन मोमीन यांनी विशेष मेहनत घेवुन सदरचा क्लीष्ट व गुंतागुतीचा गुन्हा उघडकिस आणून उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे.