कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश



कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

            कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड मधील इयत्ता १० वि चा निकाल १००% लागला असून यामध्ये प्रथम मुनझ्झा रियाझअहमद इरकल - ९३.६० %, द्वितीय निखिल गणेश अडसूळ - ९२ %, तृतीय आदित्य विठ्ठल पवार ९०. ४० % गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे . परीक्षेस बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन मध्ये यश संपादन केले. तसेच सर्वच विद्यार्थ्यांचे शालेय विषया व्यतिरिक्त गणित व सायन्स या विषयांची इयत्ता ९ वि पासूनच फाउंडेशन वर्गाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग व मेडिकल ला जाण्यासाठी जेईई / नीट या एक्झाम ची तयारी ची देखील तयारी करून घेतली जाते.निकालाची गेल्या सतरा वर्षाची उज्वल परंपरा यावर्षीही राखण्यात यश आले आहे. 

  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मिथाली पवार ८७ % या विद्यार्थीनि मराठी माध्यमातून तर मुनझ्झा इरकल , मेहरोज मोमीन ८७. ८० % या विद्यार्थिनी उर्दू मिडीयम मधून इयत्ता ८ वि पर्यंत शिकलेल्या असून कोटा जुनिअर कॉलेज येथे त्यांनी इयत्ता ९ ला प्रवेश घेऊन इंग्रजी मिडीयम मधून उत्तुंग यश मिळवले आहे .

          इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या व विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन कोटा अकॅडमीचे संचालक व ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. डॉ. महेश खुस्पे, संचालिका मा. सौ. मंजिरी खुस्पे , मा. मैथिली खुस्पे , सचिव ऍड. सतीश पाटील यांच्यासह कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स च्या प्राचार्या सौ जयश्री पवार तसेच प्राध्यापक वृंद जितेंद्र कुमार, बिश्वदीप बॅनर्जी , अनुराग कुमार, सना संदे , सौ. अष्टमी बंडगर, सौ. सारिका पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. इयत्ता नववी , दहावी , अकरावी व बारावीची प्रवेश प्रक्रिया कोटा जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी केले आहे .