चित्राताई वाघ यांचे बुके व भगवी शाल देऊन स्वागत करताना सौ कविता कचरे.
भाजपा राष्ट्रीय नेत्या चित्राताई वाघ यांची तळमावले येथील सिताई उद्योग समुहाच्या शिल्पकार कविताताई कचरे यांच्या 'शेतकरी मळा हाॅटेल' ला सदिच्छा भेट दिली. चित्राताई वाघ यांचा काल सातारा दौरा असताना तळमावले ता पाटण साईंकडे फाटा येथील सौ.कविताताई कचरे यांच्या हाॅटेल शेतकरी मळा या हाॅटेल ला आवर्जून सदिच्छा भेट दिली. व येथील चवदार गावरान जेवणाचा आस्वाद घेतला. हॉटेलमधील स्वच्छता टापटीपपणा व चविष्ट व रुचकर जेवणा बद्दल कविता कचरे यांचे व त्यांच्या हॉटेलच्या सर्व टीमचे तोंडभरून कौतुक केले. व योग्य मार्गदर्शन करून कविता कचरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली व सिताई उद्योग समुहाच्या इतर उत्पादना बद्दल सविस्तर माहिती घेऊन खास अभिनंदन केले.व गोवा येथील फुड एक्स्पो मध्ये खरडा, काळे मटण, स्टाॅल ची सूवर्णसंधी उपलब्ध करुन दिली.इतर राज्यातही सिताई उद्योग समुहाची उत्पादने राजगिरा लाडू, डिंक लाडू, खजूर लाडू,शेंगदाणा लाडू ला इतर राज्यात बाजारपेठ उपलब्ध करून देण्या बाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शन केले.
एक अविस्मरणीय भेट...
यावेळी कृष्णाकाठच्या प्रतिनिधीशी बोलताना सौ कविता कचरे म्हणाल्या भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या चित्राताई वाघ यांनी माझ्या शेतकरी मळा या हाॅटेल ला व सिताई उद्योग समुहास भेट देऊन व या उत्पादनाची चव चाखून व हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घेऊन उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल व जेवणाच्या रुचकर चवीबद्दल माझे कौतुक केले माझ्या सर्व टीमचे कौतुक केले याचा मला अभिमान आहे.
हॉटेल शेतकरी मळा ची पाहणी करताना चित्राताई वाघ व इतर.
चित्राताई वाघ यांची ही भेट म्हणजे एक अविस्मरणीय असा ठेवा आहे तो मी माझ्या जीवनात निश्चितपणे जतन करून ठेवीन. त्यांनी माझ्या इतर उत्पादनास इतर राज्यांची संधी उपलब्ध करून देण्याबाबत दिलेले आश्वासन व गोवा येथील फुड एक्स्पो मध्ये दिलेल्या सुवर्णसंधी बद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते.त्यांनी मी आजही भाजपा ची कार्यकर्ता असल्याची जाणीव करून देत असताना माझ्या मध्ये पुन्हा एकदा राजकीय इच्छाशक्ती जागृत केली तसेच माझ्या पाठीशी मोठया ताकदीनिशी उभ्या असल्याची खात्री झाली.
इतर राज्यांतही आपली उत्पादने राजगिरा लाडू, डिंक लाडू, खजूर लाडू,शेंगदाणा लाडू ला इतर राज्यात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा केली. चित्राताई वाघ यांनी नककीच नावाप्रमाणेच वाघिनीची ताकद माझ्यात निर्माण केली.
हॉटेलमधील रुचकर व चविष्ट जेवणाचा आस्वाद घेताना चित्राताई वाघ व इतर मान्यवर.
हॉटेलमधून आमच्या सर्वांचा निरोप घेताना त्यांनी व्यवसायातील एक कानमंत्र दिला. माझ्या गल्यात आवर्जून जेवणाचे पैसे देवून व्यवसायात कधीच मैत्री, राजकारण आणू नकोस तरच यशस्वी होशील हा कानमंत्र देऊन व्यवसायातील मौलिक सल्लाही दिला.
चित्राताई वाघ यांनी माझ्या हॉटेल ला भेट दिली व माझ्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करण्याचं खरं श्रेय मी माझी मैत्रीण सातारच्या सुनिशा शहा व तिचे पती माझे बंधू निलेश शहा या दोघांना देते. याप्रसंगी भाजपाचे युवा नेतृत्व भरत पाटील तसेच सुरेश रजपूत, लक्ष्मण दोडमणी, अॅड महादेव साळुंखे, युवती मोर्चा कराड तालुका अध्यक्षा वैशाली माने आदी उपस्थित होते.
सौ.कविता ताई कचरे यांनी चित्राताई वाघ यांचे शाल व बुके देऊन हॉटेल शेतकरी मळा व सिताई उद्योग समुहाच्या वतीने स्वागत केले.