पलूस| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
भिलवडी ता पलूस येथील भुवनेश्वरी मंदिरात श्री भुवनेश्वरी देवी कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळ व गुरव समाज भुवनेश्वरवाडी ता पलूस येथे सामुदायिक मौंजी बंधन सोहळ्यात 90 बटूचे मौंजी बंधन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. येथील स्थानिक श्री भुवनेश्वरी देवी कला, क्रिडा,सांस्कृतिक मंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते गुरुवार दि 5/5/2022 रोजी सकाळी सर्व शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक विधी पार पाडत या विधीसाठी लागणारे सर्व साहित्य व मौंजी बंधन सोहळ्या नंतर बटू साठी सत्यनारायन पूजा, गोधंळ हा धार्मिक विधी मोठ्या उत्सवात पार पडला. परगावचे बटूचे नातेवाईक याची निवासस्थानात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती या सामुदायिक सोहळ्यास उदयोजक गिरीश चितळे, भिलवडीचे सरपंच विद्या पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, महावीर चौगुले या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी गुरव समाज मंडळाचे कार्यकर्ते इतर मान्यवर यांचे उपस्थितीत मौंजी बटुना धार्मिक पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री भुवनेश्वरी देवी कला, क्रिडा सांस्कृतिक मंडळ व गुरव समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले की या ठिकाणी दरवर्षी या सामुदायिक सोहळ्याचे आयोजन केले जाते यावेळी अनेक बटूच्या नातेवाईक यांचे आग्रहाखातर बुधवार दि 18/5/2022 रोजी दुसऱ्या सामुदायिक मौंजी बंधन सोहळा आयोजित केला आहे.