कुठरे ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. येथील वि.का. स.सेवा सोसायटीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शना खालील शेतकरी परिवर्तन पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागा जिंकून मोठा विजय प्राप्त केला. तर विरोधी सत्ताधारी निनाई देवी सहकार पॅनेलचा दारुण पराभव केला.
निनाईदेवी विठ्ठलाई सहकार पॅनेलची 92 साला पासूनची एकहाती सत्ता असताना पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले. या सोसायटीच्या निवडणुकीसाठी एकूण सभासद 625 तर पात्र सभासद 583 असून यापैकी 320 सभासदांनी मतदान केले. मतमोजणी नंतर निवडणूक निर्णय अधिकारी गितांजली कुंभार यांनी निकाल जाहीर केला या मध्ये ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शना खालील शेतकरी परिवर्तन पॅनेलने 13 -- 0 करत सर्वच्या सर्व उमेदवार 70 मते जादा घेत सतात्तर करत मोठ्या फरकाने विजय संपादन केला तर विरोधी सत्ताधारी पॅनेला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही त्यामुळे विरोधकांची अनेक वर्षाची एकहाती सत्ता संपुष्टात आली. शेतकरी परिवर्तन पॅनेलचे प्रमुख मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि.शे.सह क्रेडिट संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे, बबन पाटील, सागर नलवडे, प्रभाकर शेलार, वसंत मुंडेकर, अधिक देसाई, वामन पवार, काका सुपुगडे, शंकर पवार, शिवाजी मोरे, अविनाश पवार, विलास मोळावडे, रामभाऊ पवार यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली गेली सभासदांनी या सर्व युवा नेतृत्वावर विश्वास टाकला व शेतकरी परिवर्तन पॅनेलच्या सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.
या अभूतपूर्व विजयानंतर नूतन विजयी उमेदवार, पॅनेलचे कार्यकर्ते यांनी गुलाल उधळत मोठा विजयी जल्लोष साजरा केला.
विजयी उमेदवार कदम दादासो आनंदा, देसाई शंकर महादू, पवार श्रीरंग शंकर, पाटील जयचंद बाबुराव, पाटील राजाराम बाळू, मूढेंकर रामचंद्र शामराव, सुपुगडे कृष्णत बाबुराव, सुर्वे रामचंद्र बाळकू, कुंभार वनिता सोपान, शिंदे वैशाली अनिल, भिंगारदेवे मोहन दादू, टोणपे रमेश गणपती, सपकाळ बाबुराव हरिबा. असे सर्व उमेदवार या निवडणुकीत सत्तातर करत विजयी झाले.
शेतकरी परिवर्तन पॅनेलचे प्रमुख नेते, सर्व विजयी उमेदवार व सभासद यांचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले.