तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्हा परिषद व लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण (शिक्षण विभाग )यांचे संयुक्त विध्यमाने तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ सन 2020-21 व 2021-22 नूकताच पार पडला.
यावेळी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, कुंभारगाव, काळगाव विभागातील आदर्श शिक्षकानी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व शाळेमधील प्रत्येक उपक्रम, स्पर्धा परीक्षा तसेच शिक्षणाच्या प्रसार व गुणवत्ता वाढीसाठी निरपेक्ष अविरत कार्य करीत शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करून शैक्षणिक आलेख चढता ठेवला. कोरोना सारख्या महाभयंकर जागतिक संकटातही तालुक्यातील सर्व शिक्षकांनी भरीव कार्य केले, जनजागृती केली त्यामुळे कोरोना सारख्या संकटावरही तालुक्यातील जनतेने मात केली. यामध्येही तालुक्यातील शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे व्रत जोपासले. शैक्षणिक कार्या बरोबर सर्वच सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, सन्मान चिन्न व सन्मानपत्र देऊन सहकार मंत्री व सातारा जिल्हा पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र राज्य सारंग पाटील (बाबा), सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिह पाटणकर, पाटण पंचायत समिती उपसभापती प्रतापराव देसाई व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
कुंभारगाव ता पाटण येथील जिल्हा परिषद शाळा नं 1 मध्ये परिसरातील शाळेतील शिक्षक, कर्मचारी ग्रामस्थ, पालक यांचे कडून कुंभारगाव शाळेतील शिक्षिका सौ पाटील माधुरी विजय यांचा मान्यवरांकडून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कुंभारगाव, काळगाव, ढेबेवाडी विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सौ पाटील माधुरी विजय कुंभारगाव कांबळे मनीषा मुकुंद, मानेगाव, दौडी वनिता तानाजी खळे, सुतार आबासाहेब शिवाजी कुठरे, पाटील राधा सुनील, धामणी, सूर्यवंशी युवराज गौतमराव, काळगाव पवार वैशाली राजेंद्र, गुढे.
कुंभार शशिकांत नारायण, सळवे भाकरे गणेश दौलतराव, पाणेरी, पाटील इंद्रायणी बाजीराव, बनपुरी पाटीलवाडी. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश आहे.