कुंभारगाव येथील सद् गुरू वि, का.स सेवा सोसायटी शेंडेवाडी चेअरमन पदी राजेंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी भरत मोरे यांची बिनविरोध निवड.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगाव  ता पाटण येथील सद् गुरू  वि. का.स सेवा सोसायटी शेंडेवाडी या विकास सेवा सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक काही दिवसापूर्वी बिनविरोध झाली होती.  बुधवार दि 25/5/2022 रोजी सोसायटी कार्यालयात चेअरमन,व्हा. चेअरमन पदाच्या निवडी संपन्न झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी गितांजली कुंभार यांचे अध्यक्षते खाली निवड प्रक्रिया पार पडली त्यांना साह्य सचिव दिपक कचरे यांनी केले. यावेळी सर्व नवनिर्वाचित संचालक यांचे एकमताने चेअरमन पदी राजेंद्र भगवानराव पाटील तर व्हा. चेअरमन पदी भरत बापू मोरे याची बिनविरोध निवड करण्यात आली. 

     निवड झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

     यावेळी नवनिर्वाचित संचालक राजाराम शंकर देसाई, जगन्नाथ तुकाराम कारंडे,विठ्ठल ज्ञानदेव माटेकर, विक्रम दिनकर वरेकर, उदय दादू मोरे, दिलीप यशवंत कळंत्रे, अमरसिंह रंगराव पाटील, शंकर बाबूराव मोहिरे,अरुण मारुती कांबळे, हिराबाई मारुती घाडगे, तानूबाई लखू मोरे, तसेच जेष्ठ पृथ्वीराज चव्हाण (बाळसु अण्णा ), रयत साखर कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, दिलीप घाडगे, महेंद्र मोरे, बाळकृष्ण मोरे आदी मान्यवरही उपस्थित होते.            

     या नवनिर्वाचित चेअरमन व्हा. चेअरमन, सर्व संचालक यांचे जेष्ठ नेते भगवानराव पाटील यांनी अभिनंदन केले.