ब्रिलियंट ॲकॅडमी तर्फे मोफत ब्रिज कोर्सचे आयोजन .

जेईई-नीट ब्रिजकोर्सचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्या : सौ. रूपाली पाटील



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
ब्रिलियंट ॲकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कराड तर्फे १० वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यासाठी मोफत 'जेईई व नीट ब्रिज कोर्स'चे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. रूपाली पाटील यांनी केले आहे.

सौ. पाटील म्हणाल्या, १० वी नंतर सायन्स क्षेत्रात करिअर करत असताना जेईई, नीट, एमएचटीसीईटी, आर्किटेक्चर, रिसर्चची तयारी करण्यासाठी सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पण शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरण पाहता विद्यार्थी स्पर्धेसाठी तयार करणे हा उद्देश दूर राहून विद्यार्थ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. जेईई व नीट परीक्षांची तयारी करवून घेणारे शिक्षक कार्यरत नसणे, किंवा असतील तर स्थिर नसणे, जेईई व नीट एकाच वर्गात शिकवले जाणे, पालकांना विद्यार्थ्यांची खरी प्रगती कळू न देणे, दर्जेदार स्टडी मटेरियल न वापरणे, विद्यार्थ्याचे डाउट स्पष्ट करण्यासाठी सक्षम स्टाफ कार्यरत नसणे. अशा अनेक समस्यांमधून विद्यार्थी स्वतःचे करिअर करण्यास सुरूवात करतो. त्यामुळे हुशार, होतकरू विद्यार्थी उत्कृष्ट निकाल देणाऱ्या रिझल्ट ओरिएटेंड अकॅडमी पासून वंचित राहू नये. 

११ वी नंतर पुन्हा त्याला चांगल्या अकॅडमीची शोधाशोध करावी लागू नये म्हणून ब्रिलियंट हाच चांगला पर्याय आहे. ब्रिलियंटमध्ये जेईई, नीट, एन. डी, ए आर्किटेक्चर, सीईटी साठी मर्यादित विद्यार्थी संख्येची बॅच चालवण्यात येत आहे. जेईई मेन्स व ॲडव्हान्स , नीट, अर्किटेक्चर, एन.डी.ए. साठी कायमस्वरूपी स्टाफ असणाऱ्या ब्रिलियंट ॲकॅडमी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सकडून १० वी चा निकाल लागेपर्यंत 'जेईई, नीट, आर्किटेक्चर , ए. डी. ए. साठी ब्रिज कोर्सचे मोफत अध्यापन केले जाणार आहे. त्याची पहिली बॅच दि. २५ एप्रिलपासून सुरू झाली आहे. पुढील बॅच १ आठवड्यानंतर सुरू होईल .

या कोर्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, आर्किटेक्चर, एन. डी.ए. विषयांच्या ११वी व १२वी मध्ये वारंवार आवश्यक असणाऱ्या बेसिक कन्सेप्ट पक्या करून देण्याची व सर्वोत्तम ॲकॅडमीचे अध्यापन कसे असते हे माहित करून देण्याची सोय करण्यात आलेली आहे.

इंजिनिअरिंग, मेडिकल, रिसर्च, डिफेन्स आदी क्षेत्रातील करिअर, ॲडमिशन प्रक्रिया, वापरावयाची पुस्तके व अभ्यासाचे योग्य नियोजन याची माहिती देण्यात येणार असून १० वी चा निकाल लागेपर्यंत दर रविवारी इ. ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार, ब्रिलियंट ॲकॅडमी व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, ओगलेवाडी येथे आयोजित केले जात आहे.