बनपुरी ता पाटण येथील पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची बनपुरी गावातून शाळेपर्यंत मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले.बनपुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनानुसार बनपुरी नं १ शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शाळापूर्व तयारीचे उदघाटन सरपंच नर्मदा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बनपुरी गावचे उपसरपंच अशोक जगदाळे, मुख्याध्यापक बिसमिल्ला संदे, उप शिक्षक मनेष झरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार, पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, अंगणवाडी सेविका, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तसेच सर्व पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पहिली वर्गासाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी दाखलपात्र विद्यार्थ्यांचे वजन,उंची नोंद घेऊन विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण आनंदायी पध्दतीने घेता यावे शिक्षणाची सुरुवात मनोरंजक पध्दतीने व्हावी तसेच शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शैक्षणिक द्रिष्टया समन्वय घडावा अशा हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यामाने या अभियनाची अंमलबजावणी सुरु झाली.