मुंबई| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सा.धगधगती मुंबईचे पुरस्कार प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक दिपक भातुसे यांनी केले. ते सा.धगधगती मुंबई च्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी १२ विविध क्षेत्रातील लोकांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर जर्नालिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ, नगरसेवक वसंत नकाशे, श्रीकांत शेट्ये, पत्रकार जयवंत बामणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
दिपक भातुसे पुढे म्हणाले की, हा सन्मान माझ्या मातीतील आहे. त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. आपल्या गावाकडील लोक जेव्हा आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकतात त्यावेळी ऊर्जा मिळते. माझे मित्र संपादक भिमराव धुळप आणि त्यांची टीम यांनी माझा केलेला सन्मान म्हणूनच माझ्यासाठी मोलाचा आहे. लोकशाही वृत्तवाहिनी स्वीकारल्यानंतर हा पहिलाच सत्कार आहे म्हणून ही त्याला महत्त्व आहे. भिमराव धुळप यांचे काम कौतुकास्पद आहे.
नगरसेवक वसंत नकाशे म्हणाले, संपादक भिमराव धुळप यांची आतापर्यंतची वाटचाल अभिमानास्पद आहे. ते खुप प्रामाणिक आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले काम अतिशय महत्त्वपूर्ण आहे.त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.
नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांनी आपल्या भाषणात भिमराव धुळप हे प्रामाणिक पत्रकार आहेत.माझे बंधुचं आहेत,त्यांचे मुंबईत स्वतःचे घर नाही यासाठी माझा त्यांना घर मिळवून देण्याचा प्रयत्न माझा राहील.मी आता नगरसेवक आहे नंतर असेल की नाही माहीत नाही.तरीसुद्धा माझ्या या भावाला स्वतःचे घर मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितले व शुभेच्छा दिल्या,
यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि, तळमावले यांच्यावतीने संपादक भिमराव धुळप यांचा शाल, सन्मानचिन्ह देवून प्रा.ए.बी.कणसे सर, डाॅ.संदीप डाकवे, सुरज शिंदे, प्रमोद माने, राजेंद्र कणसे व इतर यांनी सत्कार केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राम शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी मुक्तछंद साहित्य समुहाचे संस्थापक कवी गझलकार गजानन तुपे, नगरसेवक वसंत नकाशे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, चाईल्ड उन्नती फौंडेशन, धगधगती मुंबई परिवार, शिवसेना उपविभाग समन्वयक गणेष खाडे, शाखासमन्वयक संतोष पोटे, सुर्यकांत खैरे इ. विशेष सहकार्य केले. आभारप्रदर्शन संतोष मालुसरे यांनी केले.