ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्याचे लक्ष वेधून राहिलेल्या सणबूर (ता. पाटण )येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सुमारे ३५ वर्षांनी सत्तांतर घडवत राष्ट्रवादी काँग्रेस च्या पाटणकर गटाने सत्ता काबीज केली. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ११ जागा मिळाल्या तर सत्ताधारी देसाई गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
राजकीय दृष्टया संवेदनशील सणबूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मानणाऱ्या गटाची अनेक वर्षांपासून सत्ता होती. याखेपेस सत्ताधारी गटाचे (कै ) शिवाजीराव देसाई शेतकरी विकास पॅनल व राष्ट्रवादी काँग्रेसचे सणबुर सोसायटी बचाव पॅनलमध्ये लढत झाली. सत्ताधारी गटाचे यशवंत किसन पवार तर प्रतिस्पर्धी पाटणकर गटाचे भगवान पिलोबा खेडेकर बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित ११ जागांसाठी काल मतदान होवून सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीचे पाटणकर गटाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत, उत्तम सखाराम जाधव, चंद्रकांत पिलाजी जाधव, राजेंद्र आनंदा जाधव, श्रीरंग तुकाराम जाधव, लक्ष्मण जोती निकम, सुरेश गंगाराम साळुंखे, कृष्णत यशवंत साळुंखे, मायादेवी युवराज जाधव, सुवर्णा शिवाजी साळुंखे, आनंदा हरी मगरे. दरम्यान सत्ताधारी देसाई गटाचे शिवाजी परशराम शेवाळे हे निवडून आले. निकाल जाहिर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची अतिषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गितांजली कुंभार यांनी काम पाहिले.
____________________________________
नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार
सणबूर सोसायटी बचाव पॅनलच्या नवनिर्वाचित उमेदवारांचा आज माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते पाटण व कऱ्हाड येथे सत्कार करण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ काळे,महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी सभापती उज्ज्वला जाधव, सरपंच शारदा कुंभार, उपसरपंच संदीप जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, माजी सरपंच सचिन जाधव, पोपटराव खेडेकर,रामचंद्र साळुंखे,सदाभाऊ साळुंखे,सोनाजी सुर्यवंशी,विशाल जाधव आदी उपस्थित होते.
____________________________________