‘पिंकी चा विजय असो’ च्या सेटवर रंगली संदीप डाकवेंची कलाकारी

तळमावले/वार्ताहर
‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता प्रसारित होणारी ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका ग्रामीण भागात चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेच्या सेटवर इंडिया बुक ऑफ होल्डर युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांची कलाकारी चांगलीच रंगली. या मालिकेत पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शरयू सोनवणे, तिच्या वडीलांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल कासव, पिंकीच्या भावाची भूमिका साकारणारा लहान अभिनेतेा हर्षद नायबळ, युवराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते विजय आळंदकर, सचिन गावडे तसेच पुढाऱ्याची दमदार भूमिका साकारणारे अभिनेते उमेश बोलके यांना त्यांच्या नावातील अक्षरगणेश भेट देवून त्यांना सरप्राईज भेटी दिल्या.

या अनोख्या आणि अनपेक्षित भेटीमुळे सर्वच कलावंत भारावून गेले. डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेतून सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना मदत केली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 12,000 पेक्षा जास्त दिग्गज व्यक्तिंना कलाकृती भेट दिल्या आहेत. त्यांच्या या कामाची दखल प्रिंट मिडीया व इलेक्ट्राॅनिक मिडीया यांनी घेतली आहे. डाॅ.डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे 4 पुरस्कार तर विविध संस्थांनी 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे. विविध दिग्गजांना चित्रे भेट देण्याचा छंद त्यांनी मोठया कौशल्याने जोपासला आहे. त्यांच्या कलेचे व सामाजिक उपक्रमांचे विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

_________________________________
उलट सुलट, व्हॅक्युम क्लीनर, सही रे सही, सर्कीट हाऊस, मि.अँड मिसेस लांडगे, जस्ट हलकं फुलकं, सर प्रेमाचं काय करायचं, अलबत्त्या गलबत्त्या या नाटकांच्या सेटवर, तुझ्यात जीव रंगला, लक्ष्य, तु माझा सांगाती, गोठ, फुलपाखरु, जागो मोहन प्यारे, बाप माणूस, माझ्या नवऱ्याची बायको, नकळत सारे घडले, तुला पाहते रे, सारे तुझ्याचसाठी, छोटी मालकीन, लागीर झालं जी, कृपासिंधू, कुंकू टिकली टॅटू, देवा शप्पथ, अस्सं सासर सुरेख बाई, चला हवा येवू द्या, दख्खनचा राजा जोतिबा राजा या मालिकांच्या सेटवर तर चुकभूल द्यावी घ्यावी, बळीराजाचं राज्य येवू दे, झाला बोभाटा, मोहर या चित्रपटाच्या सेटवर आपल्या कलाकृती कलावंतांना दिल्या आहेत.
_________________________________