तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या व पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभारगाव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक 2022च्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने मोठा विजय संपादन करून सत्ता अबाधित ठेवली आहे तर विरोधी रयत परिवर्तन पॅनेलला एकही जागा मिळू शकली नाही. विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 12 जागांसाठी ही अटीतटीची लढत झाली होती.

दोन्ही पॅनलचे प्रमुख आपलेच पॅनल निवडून येणार असा दावा करत होते मात्र प्रत्यक्ष मतमोजणीनंतर माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या शेतकरी विकास पॅनलचा १३/० ने विजय झाला तर विरोधी पॅनल ला एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे इनामदार रामराव गणपत, चव्हाण बाबासो किसन, चाळके भरत पिलाजी, देसाई जगन्नाथ दत्तात्रय (दादा ), धुमाळ तुकाराम लक्ष्मण, बोर्गे जगन्नाथ गणपती, माटेकर आनंदा तातोबा, यादव रमेश काशिनाथ, धडम शालन आनंदा, सुर्वे जागुबाई दादासो, पुजारी राजेंद्र संपत व कीर्तने शशिकांत तुकाराम.
निकाला नंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची अतिष बाजी करत जल्लोष साजरा केला.