राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा पिढी घडविणारी कार्यशाळा– प्रा. आबासाहेब कणसे


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  20 मार्च 2022 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड व ग्रामपंचायत लवंडमाची यांचे संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबीर सुरू आहे. पहिल्या दिवसाचे प्रबोधनपर कार्यक्रमात 'राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व विकासाचा महामार्ग' या विषयावरील प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना प्रा. आबासाहेब कणसे म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवा पिढी घडविणारी कार्यशाळा. मन, मनगट आणि मेंदू या त्रिसूत्रीच्या बळावर व्यक्तिमत्व विकासाला विविध पैलू पाडण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेचे मध्ये केले जाते. आयुष्यामध्ये चांगले बदल घडण्यासाठी सकारात्मकता हवी असते आणि ही सकारात्मक ऊर्जा ऊर्जा मिळते ती राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातूनच. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात मिळालेल्या सु संस्कारातूनच युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करते. शिबिरातील सात दिवसांच्या सप्तपदी विचारातूनच व्यक्तिमत्व विकासाचा महामार्ग नक्कीच सापडतो त्यासाठी शिबिरार्थी दृष्टिकोण महत्त्वाचा आहे.

              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे माननीय उत्तम डिसले होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे प्रत्येक गावात झालीच पाहिजे आणि या शिबिरातून विकासकामांचा डोंगर उभा केला पाहिजे.

              या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच माननीय विजयराव दुर्गावळे उपस्थित होते. त्याचबरोबर मा. पंडित माळी, मा.रामदास सरोदे,मा. संदीप डिसले, मा.राजकुमार दुर्गावळे मा जयवंत जाधव प्रा. सचिन बोलाईकर प्रा.सुभाषकांबळे प्रा .जीवन आंबुडारे, प्रा. विश्वनाथ सुतार, प्रा.अण्णासाहेब पाटील, पंकज कुंभार, ग्रामस्थ बंधू-भगिनी शिबिरार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , आभार व सूत्रसंचालन शिबिरातील श्री स्वामी विवेकानंद गटाच्या विद्यार्थ्यांनी केले केले कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.