कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या शाळेच्या लोकार्पण सोहळ्यात आ. चव्हाण बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, गट शिक्षणाधिकारी मुजावर मॅडम, कराड दक्षिण काँगेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जि प सदस्या मंगला गलांडे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि प सदस्या विद्याताई थोरवडे, पं स सदस्य उत्तमराव पाटील, सरपंच बापूराव सुतार, उपसरपंच साधना चव्हाण, सुषमा जमाले, झाकीर मुल्ला, अबिदा भालदार, सुभाषराव चव्हाण, एम पी चव्हाण, सुरेश भोसले, मुबारक भालदार, नवाज भालदार, मधुकर जगदाळे, आदींसह वनवासमाची गावातील ग्रामस्थ व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, वनवासमाची गावातील जिल्हा परिषदेची जुन्या शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली होती, गावातील ग्रामस्थांनी मला हि बाब सांगितल्यानंतर तात्काळ तिथे सुसज्ज अशी नवीन इमारत उभारण्यासाठी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. निधी जरी मंजूर झाला तरी शाळेची इमारत पूर्णत्वास नेण्यासाठी गावातील ग्रामस्थांचा पुढाकार महत्वाचा जाणवला. अत्यंत सुसज्ज व परिपूर्ण अशी शाळेची इमारत झाली असून या शाळेत अगदी प्रसन्न वातावरणात मुलांना शिक्षण घेता येईल. या शाळेला क्रीडांगण व संरक्षक भिंत सुद्धा असणे गरजेची असल्याने त्या सुद्धा गोष्टी लवकरात लवकर उभारली जाईल व यासाठी माझा पाठपुरावा असेल.
यावेळी गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले कि, ज्यावेळी मी कराड कार्यालयात जॉईन झालो त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी माझे स्वागत केले व मार्गदर्शन करताना म्हणाले कि, माझ्या मतदारसंघात कायमच मी जास्तीत जास्त निधी आणला आहे पण भागातील जितक्या शाळा व आरोग्य व्यवस्था आहेत त्या अधिकाधिक वाढविण्याची गरज असून त्याठिकाणी दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठीच शिक्षण व आरोग्य यांवर अधिकाधिक भर असला पाहिजे. त्यांच्या चर्चे दरम्यान चे असे मार्गदर्शन एक जबाबदार लोकप्रतिनिधीची जाणीव करून देऊन गेले. यामुळेच पृथ्वीराज बाबा यांच्या प्रयत्नातून अत्यंत सुसज्ज अशी जिल्हा परिषदेची वनवसमाची येथील शाळा पूर्णत्वास आली आहे.