विकासाचा ध्यास असणारे नेतृत्व कुंभारगाव च्या सरपंच सौ.सारिका पाटणकर.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
आपल्या गावासाठी काही तरी भव्यदिव्य करावे गावाचा विकास झाला तर राज्याचा अन् देशाचा विकास होईल. गावाचा विकास करून गाव स्वयंपूर्ण बनवणे. गावात विकास योजना राबवून या विकासाच्या योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावणे आणि आपले गाव हेच आपले कुटुंब समजूनच समाज कार्य करत राहणे आपल्या पदाचा व अधिकाराचा जनतेच्या हितासाठीच उपयोग करणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचे शिवधनुष्य हाती घेतलेल्या व गावच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सर्वसामान्य महिलांसाठी आधार बनून त्यांच्या संकटसमयी धावून जाऊन मदतीचा हात पुढे करणाऱ्या आपल्या गावातील विकासाचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे एक उच्चशिक्षित व आदर्श सरपंच म्हणून अल्पावधीत विभागात एक वेगळा ठसा उमटवणारे नेतृत्व म्हणजे कुंभारगाव च्या सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी 1 वर्षापूर्वी सरपंच पदाची जबाबदारी सांभाळली या एक वर्षात केलेल्या गावच्या विकासाचा आढावा जनतेसमोर ठेवला आहे. त्यांची एक वर्षाची वर्षपूर्ती व त्यामुळे गावच्या विकासाला आलेली गती हे पाहता हे महिला नेतृत्व निश्चितपणे भविष्यात यशस्वी वाटचाल करेल गावचा सर्वांगीण विकास साधून त्या यशस्वी होतील असे गावातील लोकांना वाटते.
सरपंच पदाची जबाबदारी घेऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षात गावच्या विकासासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन व ग्रामपंचायतीतील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांचा पाठिंबा व मार्गदर्शन या जोरावर या वर्षात गावचा भक्कम विकास करण्यात यशस्वी झालेले एक महिला नेतृत्व म्हणजे कुंभारगाव च्या आदर्श व उच्चशिक्षित सरपंच सौ सारिका योगेश पाटणकर होय. आपली सरपंच पदाची वर्षपूर्ती व या एक वर्षाच्या काळात यांनी गावच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा, विकास कामाचा लेखाजोखा, आढावा त्यांनी गावातील जनतेसमोर ठेवला आहे.
माणसाशी नातं जोडलेल्या व सर्वसामान्यांना बरोबर घेऊन गावच्या विकासाचा ध्यास मनी असलेल्या या महिला सरपंचांनी 1 वर्षापूर्वी आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीला सुरुवात केली सरपंचपद हे गावच्या विकासासाठी असते ही मनाशी खुणगाठ बांधून त्यांनी गावच्या विकासासाठी व प्रलंबित कामांना न्याय देऊन ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपल्या कामाची सुरुवात केली व आज एक वर्ष पूर्ण होत आहे.
वर्षपूर्ती कालावधीमध्ये कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने सर्व जनता भयभीत झाली होती याभयभीत जनतेला आधार दिला घरोघरी फिरून जनजागृती केली. हे जनतेवरील संकट अतिशय काळजीपूर्वक हाताळून प्रशासन, कोरोना कमिटी,आरोग्य विभागा बरोबर सातत्याने कार्यरत राहून कोरोना संदर्भातील जनजागृती गावातील जनतेत निर्माण करून कोरोनाला कमी वेळात रोखण्यात या गावाला यश मिळाले. यामध्ये कोरोना कमिटी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य मिळाले त्यामुळेच कोरोना पूर्णपणे गावातून हद्दपार करता आला.याआदर्श सरपंचांनी समाजसेवेचा एक आदर्श जनतेपुढे ठेवला आहे.
सामाजिक कामाची प्रेरणा घरातूनच त्यांना मिळाली. पती राजे संघर्ष प्रतिष्ठान चे अध्यक्ष योगेश पाटणकर हे सुद्धा एक उत्तम समाजसेवक आहेत आणि यामुळेच समाजसेवा करताना त्यांचे मोलाचे सहकार्य त्यांना सातत्याने मिळत गेले. गावात सामाजिक आणि धार्मिक कामे करीत असताना ज्येष्ठांच्या आशीर्वादाने गावच्या ग्रापंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदी विक्रमी मतांनी निवडून आल्या आणी गावाचा कारभार हाती घेताच विकास कामाचा धडाका सुरू केला.
सरपंच सौ.सारिका पाटणकर यांची सरपंचपदी निवड झाल्यापासून वर्षभरात गावच्या विकासासाठी 36 लाखाच्या वर निधी खर्च करण्यात आला आहे.
वर्षभरातील गावच्या विकास कार्याचा थोडक्यात आढावा ८ फेब्रुवारी २०२१ ते ८ फेब्रुवारी २०२२.
१)मौजे कुंभारगाव आनंदनगर येथे अंतर्गत कोक्रीट रस्ता व बंदिस्त गटर बांधणे : ₹ ८०००००
२) १५% मागासवर्गीय खर्च मधून आनंदनगर येथील
बुद्धविहार रंगरंगोटी करणे : ₹ ७६०००
३) मान्याचीवाडी(मातंगवस्ती) तील विहिरीवरील झाकण
बसविणे : ₹ ९०३२८
४) मान्याचीवाडी येथे सार्वजनिक शौचालय युनिट बांधणे : ₹ ३०००००
५) मौजे कुंभारगाव येथे रस्ता मुरमीकरण करणे : ₹ २५०००
६) गावठाण विहिरीजवळ संरक्षक भिंत बांधणे : ₹ ४४०००
७) गावठाण विहीरीजवळ कॉंक्रीटीकरण करणे : ₹ ११८०००
८) ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावरील गळती काढणे : ₹ ४००००
९) गावठाण विहिरीत सांडपाणी जाऊ नये म्हणून संरक्षक
भिंत बांधणे : ₹ ४००००
१०) चिंचाबा माटेकरवाडी येथे नळपाणी पुरवठा दुरूस्ती
करणे : ₹ ३२०२०
११) चोरगेवाडी आडाशेजारी बंदिस्त गटरवर स्लॅप टाकणे : ₹ ३८०००
१२) शिबेवाडी येथील रस्त्यावर २ स्पीडब्रेकर बसविणे : ₹ ३०००
१३) कुंभारगाव येथे नळ पाणीपुरवठा दुरूस्ती करणे
१४) कुंभारगाव उपकेंद्रास ग्रामपंचायतीकडून रेफ्रीजरेटर दिले : ₹ १५०००
१५) मान्याचीवाडी (मातंगवस्ती) येथे अंतर्गत कोंक्रीट रस्ता व बंदिस्त गटर बांधणे : ₹ ३५८०००
१६ ) पोतेकरवाडी, बामणवाडी, शिबेवाडी, चोरगेवाडी, बोरगेवाडी, कुंभारगाव नळपाणी पुरवठा दुरूस्ती करणे : ₹ ११५०००
१७) कचरा डम्पिंग करण्यासाठी खोल खड्डा खणणे व कचरा गाडी आत जाण्यासाठी गेट बसविणे : ₹ ५००००
१८) मान्याचीवाडी अंगणवाडीमध्ये किचनकट्टा बनविणे, शौचालयासमोर फरशी बसविणे व कंपाउंड बनविणे तसेच छताच्या दरूस्तीसाठी पत्रे बसविणे : ₹११००००
१९) मौजे कुंभारगाव येथील शिबेवाडी येथे जनसुविधा मधून स्मशानभूमी बांधणे :₹ ३०००००
२०) मान्याचीवाडी(मातंगवस्ती) येथे बंदिस्त RCC गटर बांधणे : ₹ ४५००००
२१) कुंभारगाव व वाडीवस्तीतील गटर सफाई करणे : ₹ ५००००
२२) बोरगेवाडी येथे रस्ता कोक्रीटीकरण करणे : ₹ २२५०००
२३) लक्ष्मीदेवी मंदीराजवळील झरीचे पाणी विहिरीत वळविणे : ₹ ७१९१२
२४) राष्ट्रीय पेयजल योजनेतील पाणी पुरवठा विहिरीजवळील पंपहाऊस मध्ये नवीन कंट्रोल पॅनल बसविणे : ₹ १७७७४४
२५) चिंचाबा माटेकरवाडी येथे बंदिस्त RCC गटर बांधणे : ₹.७००००
२६) जांभूळवाडी येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू करणे : ₹.१५०००
ही सर्व कामे ग्रामस्थांचे सहकार्य, वरिष्ठांचे मार्गदर्शनाने करण्यात आली. गावाच्या विकास कामाला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा), सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश पाटणकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
भविष्यातही गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असून कुंभारगाव हे आदर्श गाव करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दैनिक कृष्णाकाठ शी बोलताना दिली.
___________________________________
गावच्या विकासासाठी कटिबद्ध : सरपंच सौ सारिका पाटणकर यांची ग्वाही.
गावच्या सरपंच पदाची जबाबदारी घेऊन अवघे एक वर्ष आज पूर्ण होत आहे. गावातील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायत सदस्य सहकारी, प्रशासनातील अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी, राजकीय नेते या सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
भविष्यात यापुढेही मला जनतेची सेवा अधिक कार्यक्षमपणे करावयाची आहे. गावची अनेक विकास कामे पूर्णत्वाकडे न्यायची आहेत. त्यासाठी गावातील जनतेचे पाठबळ, सहकार्य मिळावे. कुंभारगाव हे जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून नावलौकिक प्राप्त करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन. गावचा विकास हेच माझे ध्येय असेल त्यासाठीच मी माझ्या पदाचा, अधिकाराचा वापर करीन.
अशी प्रतिक्रिया सरपंच पदाच्या वर्षपूर्ती च्या निमित्ताने सरपंच सौ सारिका पाटणकर यांनी कृष्णाकाठ शी बोलताना दिली.
___________________________________