अंत्ययात्रेसाठी अवघा जनसागर लोटला, जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांची अंत्यविधीसाठी उपस्थिती.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे संस्थापक व मातोश्री उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. अशोक भावके यांचे मंगळवारी रात्री दुर्देवी अपघाती निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी घोगाव ता.कराड येथील वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरुवातीस सकाळी 9:00 वाजता घोगाव येथील सिद्धी पेट्रोलपंपा पासून अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या ओपन वाहनात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होतेे. स्त्याच्या दुतर्फा हजारो लोकांनी आपल्या लोकप्रिय नेत्याचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसेना व इतर पक्षाचे पदाधिकारी व मित्रपरिवार अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
अंत्ययात्रेत अवघा जनसागर लोटला होता. अमर रहे, अमर रहे भावके साहेब अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
अंत्ययात्रा गुरुकुल निवासी विद्यालय शिवाजीनगर, व श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात थांबवून पार्थिव जनतेच्या अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी संतकृपा शिक्षण संस्थेतील पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी, ग्रामस्थ यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले.यावेळी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही येथे भेट देऊन पार्थिवाचे दर्शन घेतले व श्रद्धांजली अर्पित केली.श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसून जोहरी व सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीही पार्थिवाचे दर्शन घेतले व संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.
अंत्यविधीसाठी जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील साहेब, माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिण चे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा), भाजपचे युवा नेते अतुल बाबा भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते वसंतराव मानकुमरे, शिवसेनेचे पदाधिकारी नितीन काशीद, तात्या घाडगे, जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख, कामेरी चे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दी.बा पाटील, कराडचे माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी. दक्षिण मधील असंख्य कार्यकर्ते व संपूर्ण परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
रक्षाविसर्जन कार्यक्रम घोगाव तालुका कराड येथे रविवार दिनांक 20/02/2022 रोजी सकाळी 10:00 वाजता होणार आहे.