लता मंगेशकर आणि रमेश देव यांना शिवसमर्थ च्या वतीने श्रध्दांजली


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर आणि मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना आदरांजली वाहण्यासाठी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, नानासाहेब सावंत, प्रा.पी.आर.सावंत, सुदाम फिरंगे सर, देवबा वायचळ सर, सुनील ढेंबरे, प्रा.अशोकराव शिबे, उमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, संदीप डाकवे, रविंद्र पाटील, विजय मोहिते, नितीन पाटील, संस्थेचे अन्य अधिकारी व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.

 शोकसभेच्या प्रारंभी लता मंगेशकर, रमेश देव यांच्या प्रतिमेला हार घालून, पुजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. याचवेळी शिवसमर्थ संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामधील सर्व शाखांमध्ये एकाचवेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, सुनील ढेंबरे, सुदाम फिरंगे सर, देवबा वायचळ सर व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.