बी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांचा सत्कार करताना संस्थेचे सचिव प्रसून जोहरी सर .
घोगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव या महाविद्यालयात कर्करोगावरील संशोधनाकरिता प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय यांच्याकडून 16 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. सदर अनुदान हे ग्रामीण पर्यावरणातील जड धातूंचे प्रदूषण व त्यामुळे होणारे कर्करोग यावरील संशोधनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांना प्राप्त झाले आहे. सदर संशोधनामुळे ग्रामीण भागात वाढलेल्या कर्करोगाचे कारण शोधून त्याचे निरसन करण्यास मदत होईल सदर संशोधन प्रकल्पासाठी डॉ. अडवीराव बेलवोटगी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरलेलीमठ यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी केले.
या वेळी बोलताना ते म्हणाले राष्ट्रीय स्तरावरील संशोधन अनुदान मंजूर होणे सर्वांसाठी आनंदाची बाब असून संशोधन, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रमाणात कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालक डॉ.अशोक जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी यांनी संशोधनाकरीता अनुदान मंजूर झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ यांचे अभिनंदन केले.