सामाजिक बांधिलकी जपत साजरा होणार अनोखा वाढदिवस.
ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
नको हार, नको शाल, नको बुके, नको भेटवस्तू.
गरज आहे अनेक जीव वाचवायची.
त्यासाठी खरी गरज आहे रक्तदानाची.
सर्वात श्रेष्ठ दानाच्या रक्तदानाची.....!
आपण समाजात वाढदिवस साजरे करण्याचे अनेक प्रकार पाहतो, वाचतो पण एका पोलिस अधिकार्याचा वाढदिवस समाजाप्रती प्रेम, सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचा महा संकल्प दिन म्हणून साजरा होणार आहे. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व अपघात व इतर अनेक कारणामुळे हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांसाठी रक्ताची खूप गरज असते त्याची जाणीव ठेवून ढेबेवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी आपला रविवार दि.30 जानेवारी रोजी होणारा वाढदिवस समाजाशी नाते जोडणारा सध्याची रक्ताची गरज ओळखून बुके, भेटवस्तू न स्वीकारता रक्तदान करून शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन नागरिकांना मित्रपरिवाराला केले आहे. म्हणूनच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात केले आहे. या महारक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते 4 या वेळेत आयोजित केले आहे. या वेळेत येऊन नागरिकांनी, युवकांनी रक्तदान करावे व सामाजिक सेवेचा, रुग्णांना मदत केल्याचे समाधान लाभावे याकरिता मोठ्या संख्येने रक्तदान करा व समाजहिताला प्राधान्य द्या असे आवाहन ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे स.पो.नि संतोष पवार यांनी केले आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे अनेक जीव वाचतात तीच खरी समाजसेवा होईल. यासाठी नागरिकांनी युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन स.पो.नि संतोष पवार यांनी केले आहे. संतोष पवार यांच्या या वाढदिवसाच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.