घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राज्याच्या शालेय शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड यांच्या सहकार्याने व समाजसेवक भिमराव धुळप यांच्या प्रयत्नाने कराड तालुक्यातील घोगाव येथे एकनाथ फाऊंडेशनने जल शुध्ददीकरण मशीन भेट म्हणून दिली आहे .या कामाचा शुभारंभ माजी खासदार दिवंगत एकनाथ गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त शनि दि १ जाने रोजी मौजे घोगाव श्री बाळसिद्ध मंदिर येथे गावातील मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून , गुलाल उधळून करण्यात आला.
एकनाथ गायकवाड फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पाणी शुद्धीकरण मशीनसाठी 2 लाख 85 हजार रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे .या कार्यक्रमाला कराड दक्षिण काँग्रेस चे प्रवक्ते पै.तानाजी चवरे (आप्पा) पं,सं.सदस्य ,काशिनाथ कारंडे घोगावच्या सरपंच सीमा पाटील,उपसरपंच निवास शेवाळे,आणि सदस्य,पोलिस पाटील शिवाजी भावके, समाजसेवक एकनाथ तांबवेकर, संजय भावके,नानासो भावके यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक शिवाजी जाधव यांनी केले तर आभार नानासाहेब साळुंखे यांनी मानले.