युजीसी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) मंद्रुळकोळे (ता.पाटण) येथील रागिणी दिलीपराव पाटील यांनी उज्ज्वल यश संपादन केले.
रागिणी पाटील यांनी संख्याशास्त्र विषयातून एमएस्सीची पदवी संपादन केली असून सध्या त्या शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्रात पीएचडी करत आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेतलेल्या प्राध्यापक पदासाठीच्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) त्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.काल या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.राज्यभरातील ७९ हजार ७७४ उमेदवारांनी सेट परीक्षा दिली होती,६.६४ टक्के निकाल लागला.रागिणी यांचे प्राथमिक शिक्षण मंद्रुळकोळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात झाले आहे.कऱ्हाडच्या सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातून त्यांनी संख्याशास्त्रातून बीएस्सी तर सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून एमएस्सीची पदवी विशेष गुणवत्तेसह संपादन केली आहे.सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.मोहन राजमाने,उपप्राचार्य एस.ए पाटील,प्राचार्य डॉ.आर.आर कुंभार,डॉ.एस.व्ही काकडे,डॉ.एच.पी उमप आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रागिणी पत्रकार राजेश पाटील यांची पुतणी आहे.