कोल्हापूर|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मूळ गाव कडवे, ता. शाहूवाडी गावच्या रहिवासी प्रा.स्नेहा राजेश जगताप यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मार्फत नुकतीच फार्मसी विषयातील सर्वोच्च पदवी पी.एच.डी. प्राप्त झाली. 'बायोअधेजीव ड्रग डिलिव्हरी फॉर पुअरली सोल्युबल ड्रग्स' या विषयावरील शोधप्रबंध त्यांनी सप्टेंबर २०२० मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सादर केला होता. मधुमेहाशी संलग्नित इतर आजार तसेच विविध कारणांमुळे शरीराला होणाऱ्या वेदना यावर औषधनिर्माण शास्त्रातील नावीन्याचा तसेच नैसर्गिक घटकांचा वापर करून प्रभावी औषध बनवणे हा त्यांच्या पीएचडी संशोधनाचा मुख्य विषय होता. डॉ.स्नेहा यांचे शालेय शिक्षण नयोदय विद्यालय कागल येथे पूर्ण झाले आहे, तसेच त्यांनी औषधनिर्माणशास्त्रची पदवी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी सांगली येथून विषेश प्राविण्यासह प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केली तथा पदव्युत्तर पदवी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर येथून प्रथम श्रेणित पूर्ण केली. सध्या डॉ.स्नेहा अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ बी फार्मसी आष्टा येथे फर्मास्युटिक्स विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी कासेगावचे प्राचार्य डॉ.सी.एस.मगदूम हे त्यांच्या पी.एच.डी. चे प्रमुख मार्गदर्शक होते तसेच त्यांना भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सौ. स्नेहा यांचे आई वडील श्री. दिनकर चव्हाण व सौ. दीपा चव्हाण हे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत आणि त्यांच्याच विचारांचा वारसा जपत डॉ. स्नेहा यांनी घर , कुटुंब , संसार व नोकरी सांभाळून हे यश प्राप्त केले आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. त्यांचे पती डॉ. राजेश जगताप यांनी देखील ऑगस्ट २०२० मध्ये शिवाजी विद्यापीठ येथून फार्मसी विषयातील पी.एच.डी. पदवी प्राप्त केली आहे. पती पत्नी दोघांनीही हे उतुंग यश प्राप्त केलेबद्दल सर्व स्तरातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. डॉ. स्नेहा यांचे दीर डॉ. संजय जगताप यांनीही नुकतीच शिक्षणशास्त्र विषयायील पी. एच. डी. बोस्टन युनिव्हर्सिटी अमेरिका येथून प्राप्त केली आहे तसेच लहान बंधू प्रा. संदीप चव्हाण हे देखील शिवाजी विद्यापीठ येथुन फार्मसी विषयातील पी.एच. डी. करत आहेत. एकूणच जगताप आणि चव्हाण घरान्याचा शैक्षणिक वारसा जपत मिळवलेले हे यश एक कौतुकाची बाब म्हणून चर्चिली जात आहे. संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव आर.आर.डांगे (भाऊ), कार्यकारी संचालक प्रा.आर. ए. कनाई , रजिस्टार प्रा. एस. बी. हिवरेकर, प्राचार्य डॉ.एम. जी. सरलया यांचे त्यांना विशेष सहकार्य लाभले.