प्रा. डॉ. रामलिंग पत्रकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान.

कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव, ता.कराड, जि.सातारा या महाविद्यालयातील फार्मा कोग्नोसी चे प्राध्यापक डॉ. रामलिंग गंगाधर पत्रकर यांनी यकृताच्या आजारावर उपयुक्त औषधी वनस्पतीवर यशस्वी शोध प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सादर केला त्याबद्दल त्यांना पीएच. डी. ही पदवी प्रदान करून गौरवण्यात आले. डॉ. पत्रकर यांनी आपला पीएच. डी. चा शोध प्रबंध डॉ. ओमप्रकाश भुसणुरे सरांचे मार्गदर्शन खाली पूर्ण केला. त्याचबरोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या फार्मसी विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ एस जे वाढेर सर, प्राध्यापक पेकमवार सर, प्राध्यापक ढवळे सर, प्राध्यापक क्षिरसागर सर,प्राध्यापक नवघरे सर व चनबसवेश्वर कॉलेज चे प्राध्यापक पंचभाई सर यांचेही मार्गदर्शन लाभले. 

डॉ. पत्रकर यांचे मुळ गाव वसमत जिल्हा हिंगोली होय. मात्र ते नोकरी निमित्त मागील १४ ते १५ वर्षांपासून ते घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांनी पदवी नांदेड फार्मसी कॉलेज येथून तर पदव्युत्तर शिक्षण जे. एस. एस. फार्मसी कॉलेज उटी, तामिळनाडू येथून घेतले. डॉ. पत्रकर यांचे श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्षा डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संस्थेचे सर्व संचालक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजयानंद अरलेलीमठ, डी फार्मसी महाविद्यालया च्या प्राचार्या सौ.वैशाली महाडिक, श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी.टेक) चे प्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेज (सायन्स) च्या प्राचार्या सौ पुष्पा पाटील, संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. सुप्रिया पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.





प्रा. डॉ. रामलिंग पत्रकर यांचे स्वागत करताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या फार्मसी विभागाचे संचालक प्रा. डॉ एस जे वाढेर सर, प्रा. पेकमवार सर, प्राध्यापक ढवळे सर, प्रा. क्षिरसागर सर,प्राध्यापक नवघरे सर व चनबसवेश्वर कॉलेज चे प्राध्यापक पंचभाई सर.