मान्याचीवाडी मंदिरात नामजप व मंदिर कलशारोहन समारंभाचे आयोजन








तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी डोंगरावरची (गुढे) येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कलशारोहन व वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त नामजप यज्ञ व मंदिर कलशारोहन समारंभानिमित्त शुक्रवार दि.31 डिसेंबर, 2021 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. गुरुवार दि. 30 डिसेंबर, 2021 रोजी तळमावले ते मान्याचीवाडी कलशासह पायी मिरवणूक सोहळा, शुक्रवार दि.31 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 7 ते 11 पर्यंत ह.भ.प. बालब्रम्हचारी रमेश महाराज काजारी यांचे हस्ते कलशारोहन तर सकाळी 11 ते 1 पर्यंत हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल.

शनिवार दि.1 जानेवारी, 2022 रोजी कृश्णकांत शिर्के यांचा अभंगवाणी चा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि.2 जानेवारी रोजी ह.भ.प. प्रा.प्रदीप यादव साईकडे यांचे प्रवचन, ह.भ.प. अमोल महाराज पाटील यांचे कीर्तन, सोमवार दि.3 जानेवारी रोजी ह.भ.प. भास्कर महाराज मोळावडेवाडी यांचे प्रवचन आणि ह.भ.प. ज्ञानेश्ववर महाराज सांगवड यांचे कीर्तन, मंगळवार दि.4 जानेवारी ह.भ.प.यशवंत महाराज कुंभारगांव यांचे प्रवचन आणि ह.भ.प.हणमंत महाराज अंतवडीकर यांचे कीर्तन यांचे कीर्तन होईल. याच दिवशी दुपारी 2 ते 5 विठ्ठल रखुमाई मंदिर ते मान्याचीवाडी मंदिर शिबेवाडी भव्य दिंडी सोहळा होणार आहे.

शुक्रवार दि.31 डिसेंबर, 2021 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ होणार आहे.

याशिवाय दररोज सकाळी 4.30 ते 6.30 काकड आरती, सकाळी 7 वाजता विठ्ठल रखुमाई अभिषेक, सकाळी 9 ते 10 व दुपारी 3 ते 4 नामजप यज्ञ,  सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व नंतर जागराचा कार्यक्रम होईल. दरम्यान गुढे, शिद्रुकवाडी, दळवीवाडी, वायचळवाडी, पाचुपतेवाडी, शिबेवाडी वरची व खालची, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, कुठरे पवारवाडी, कदमवाडी, मोरेवाडी, मोळावडेवाडी, जुळेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, करपेवाडी, शिवसमर्थ भजनी मंडळ, तळमावले, शिबेवाडी-मान्याचीवाडी-कुंभारवाडी कुंभारगांव व पंचक्रोशीतील भजनी मंडळ साथ करतील.

तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी, शिबेवाडी (गुढे), पाटीलवाडी (कुंभारगांव), विठ्ठल रखुमाई मंडळ मान्याचीवाडी गुढे यांनी केले आहे.