संकटग्रस्त ऊसतोड मजुरांसाठी श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालय बी टेक च्या विद्यार्थी व स्टाफचा मदतीचा हात.








घोगाव परिसरातील ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करताना श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कर्मचारी.

घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्याच बरोबर बाहेरगावाहून आलेल्या ऊसतोड मजुरांचे प्रचंड हाल झाले. या अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या राहुटीत पाणी जाऊन त्यांचे अन्नधान्य कपडे याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ऊस तोड मजुरांसाठी व त्यांना व त्यांच्या विस्कटलेल्या संसाराला हातभार लावण्यासाठी श्री संतकृपा इंजिनिअरिंग बीटेक च्या विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला. या संकटग्रस्त ऊसतोड कामगारांना मदत देण्याचे आवाहन केले व या आवाहनानुसार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने जी शक्य ती मदत केली.  

 घोगाव तालुका कराड परिसरातील ऊसतोड मजुरांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शेतावर जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे किट व कपडे वाटप केले.  

               यावेळी सिव्हिल विभागाचे प्रमुख NSS कमिटीचे हेड श्री. कुंभार सर तसेच कमिटीचे सर्व सदस्य, विद्यार्थी आणि स्टाफ उपस्थित होते.



               या सामाजिक उपक्रमाबद्दल श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालय बी टेक चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले व या मदतीसाठी धावून येणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जपणार्‍या सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.