तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
स्वच्छ व पारदर्शी कारभारांने सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या मर्चंट सिंडिकेट ग्रा.बि. शेती सहकारी क्रेडिट संस्था मर्या;तळमावले यांच्या वतीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तीन सभासदांना वाहनांचे वितरण करण्यात आले.

चेअरमन अनिल शिंदे व व्हा.चेअरमन राजेश करपे यांच्या हस्ते वाहन वितरण करण्यात आले. राजेंद्र मोरे यांना KIA SELTOS, विश्वनाथ कदम यांना ASHOK LEYLAND तसेच अमृत पवार यांना TVS JUPITER ही वाहने वितरण करण्यात आली.
यावेळी दत्तात्रय गणेशकर, रोहित मोरे,शत्रुघ्न पवार, राजू ताईगडे, सुनिल आसळकर, सतीश तवर, सुनिल पाटील, तुकाराम जाधव, लक्ष्मण पवार,संदीप पाटील, ओंकार शिंदे, व्यवस्थापक दिलीप गुंजाळकर, उपव्यवस्थापक शरद शिंदे हे मान्यवर व सेवक वर्ग उपस्थित होते.
संस्थापक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची दमदारपणे प्रगतीकडे वाटचाल सुरूआहे. संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन करून जनसामान्यात व सहकारात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.