तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
‘‘वाढदिवस आपल्या स्पंदनचा, संदेश सामाजिक बांधिलकीचा’’ अशा आशयातून स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प डाकवे परिवाराने केला आहे. याच संकल्पनेतून यावर्षी स्पंदनच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना शालेय साहित्याची ज्ञानाची शिदोरी देण्यात येणार आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील चि.स्पंदन रेश्मा संदीप डाकवे याचा 7 वा वाढदिवस गुरुवार दि. 21 ऑक्टोबर, 2021 रोजी येत आहे. या निमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबवण्यात येत आहे.
स्पंदनच्या प्रथम वाढदिवसादिशी भेटवस्तूऐवजी जमा झालेली रक्कम रु. 35,000/- ‘नाम’ फाऊंडेशनला दिली आहे. दुसऱ्या वाढदिवसाचा खर्च टाळून वाढदिवसाचे रु.5,000/- आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला जमा केले आहेत. तिसऱ्या वाढदिवसाला स्पंदनची ग्रंथतुला करुन जमलेली रु.11,000/- ची सर्व पुस्तके जि.प. शाळेला दिली आहेत. चौथ्या वाढदिवसाचा खर्च टाळून दिव्यांग मुलांना चित्रकलेचे साहित्य दिले आहे. पाचव्या वाढदिवसाला शांताई फाऊंडेशन ला रु.5,000/- किमतीचे जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. सहाव्या वाढदिवसाला गरजू विद्यार्थ्यांची रु.6,000/- ची शैक्षणिक फी जमा केली आहे. अशाप्रकारे चि.स्पंदनचा प्रत्येक वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत एका वेगळया उपक्रमाने साजरा केला जातो.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये एक वही एक पेन 16,000/- ची मदत, माणुसकीच्या वहया 11,000/- ची मदत, ज्ञानाची शिदोरी 28,100/- ची मदत, रु.3,000/- चे गणवेष वाटप, डाकेवाडी शाळेला 5,000/- चे तक्ते वाटप, ग्रंथतुलेतून 11,000/- ची पुस्तके वाटप, प्राथ. शाळा डाकेवाडी व कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, कुठरे व जांभूळवाडी शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप, ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तके देवून, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, विनामूल्य भिंती रेखाटन, किल्ले बनवा स्पर्धा, असे उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे आणि परिवाराने सामाजिक जबाबदारीचे भान ओळखत राबवलेले उपक्रम नक्कीच प्रशंसनीय आहेत. या उपक्रमाला शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, बाळासाहेब कचरे, प्रा. ए.बी.कणसे, प्रा.जयंत कदम, सुरेश जाधव, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, भरत डाकवे, आप्पासोा निवडूंगे तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभते.
ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात ज्यांना मदत करावयाची आहे तसेच ज्यांना प्रत्यक्ष या वाढदिवसासाठी येणे शक्य नाही अशा व्यक्तींनी डाॅ.संदीप डाकवे मो. 9764061633 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डाकवे परिवाराकडून करण्यात आले आहे.