कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात कुंभारगाव मधील ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात कुंभारगाव मधील ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या आदेशांचे व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेचे पालन करून कुंभारगावात यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
तसेच अनंत चतुर्थीला रविवारी सकाळ पासूनच घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनास उत्साहपूर्ण वातावरणात सुरवात झाली होती सर्व नागरिक जड अंतःकरणाने आपल्या बाप्पाला निरोप देत होते.
प्रशासनाच्या नियमावलीनुसार अत्यंत साधेपणाने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी आपल्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला.
लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होऊ दे व पुढील वर्षीचा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होऊ दे अशी प्रार्थना गणेश भक्त विसर्जना वेळी गणरायाकडे करताना दिसत होते.