दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी ‘विचारांच्या पलीकडले’ या विचारमंचावर निवेदक/अभिनेता रोहन गुजर यांना त्याचे रेखाचित्र देवून 10 हजार कलाकृती प्रदान करण्याचा टप्पा डाॅ.संदीप डाकवे यांनी पूर्ण केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शिल्पकार राजेंद्र कुंभार, अभय वीर, विशाल डाकवे, सुनिल सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी रोहन गुजर यांना ‘मनातलं हा चारोळी संग्रह भेट दिला. तसेच कार्यक्रमाचे निर्माते डाॅ.आलोक खोब्रागडे, राजेंद्र फरांदे यांना सुद्धा त्यांच्या नावातील अक्षरगणेशा भेट दिले.
ठिपक्यातून रेखाटलेले अप्रतिम चित्र डाॅ.डाकवे यांनी रोहन गुजर यांना दिले. या चित्राचे त्यांनी खूप कौतुक केले व डाॅ.संदीप डाकवे यांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी यांना अक्षरगणेशा, शब्दचित्रे, पेपटर कटींग आर्ट, ठिपका चित्रे भेट दिली आहेत. हे करताना त्यांनी 20 पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवले आहेत. त्यामधून मिळालेला 1 लाखापेक्षा जास्त निधी त्यांनी गरजुंना दिला आहे. याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजुंना लाखोंचे साहित्य प्रदान केले आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी 20 पेक्षा जास्त हस्तलिखिते तयार केली आहेत. त्यांनी राबवलेल्या वेगवेगळया उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा तर हायरेंज बुक ऑफ वल्र्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना 4 पुरस्कार तर विविध संस्थांनी 50 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे.
डाॅ. डाकवे यांच्या उपक्रमांची दखल खसखस वेब पेज, वृत्तमानपत्रे, इलेक्ट्राॅनिक मिडीया, दुरदर्शन इ.नी घेतली आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली असून 4 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याषिवाय 50 पेक्षा जास्त पुस्तकांची मुखपृश्ठे त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहेत. तसेच स्पंदन प्रकाशनाच्या माध्यमातून 5 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डाॅ.डाकवे यांनी पत्रमैत्रीचा छंद देखील जोपासला आहे.
10 हजार कलाकृती भेट दिल्याबद्दल डाॅ. संदीप डाकवे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
______________________________________
मान्यवरांकडून डाॅ.डाकवे यांचे कौतुक :
युवराज संभाजीराजे छत्रपती, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उपनेते प्रा.नितीन बानुगडे, खा.श्रीनिवास पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, इदंरजित देशमुख, सिंधुताई सपकाळ, अपर्णाताई रामतीर्थकर, डाॅ.प्रकाश आमटे, सुनिती सु.र., आदिशवर धारेश्वर वर महाराज, महंत स्वामी आबानंदगिरीजी महाराज, कर्नल हितेश चोरगे, कॅप्टन अमोल यादव यांनी डाॅ.डाकवे यांच्या कलेचे कौतुक केले आहे.
______________________________________
डाॅ.संदीप डाकवे यांचेकडून सेलिब्रिटींना चित्रे भेट :
______________________________________
डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले कलात्मक उपक्रम:
शब्द -ठिपके यामधून चित्रे
मोरपीस-पिंपळ पानावर चित्रनिर्मिती
पेपर कटींग आर्ट
जवान, वारीचे मोठे पोस्टर
आपटयाच्या पानातून संदेश
छत्री/मास्क यावर कॅलिग्राफी
अक्षरगणेशा उपक्रम
मोठी भित्तीपत्रिका
नीलकंठ खाडीलकर यांची 83 चित्रे
ना. शंभूराज देसाई यांची 54 चित्रे
अक्षर अभंग वारी उपक्रम
133 शब्दातून कर्मवीरांना मानवंदना
पुस्तकांची मुखपृश्ठे, व्यंगचित्रे रेखाटन
____________________________________